बीड जिल्ह्याची सुपुत्री स्वेता वाघमारे प्रथमच चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – धनश्री फिल्म्स प्रस्तुत व योगेश ढोकने निर्मित मराठी चित्रपट ‘झागडू’ या चित्रपटाच्या पोस्टर अनावरणाचा दिमाखदार सोहळा नुकताच राहुरी, जिल्हा – अहमदनगर येथे राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे, खासदार सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, मेघराज भोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), लहुजी कानडे, शिवशाहीर विजय तनपुरे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

‘झागडू’ या चित्रपटाचे दिगदर्शन देवा वाघ यांनी केले असून सहदिग्दर्शक योगी निकम हे आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सांगली, सातारा, कोल्हापूर, करमाळा, अकुलनेर आदी ठिकाणी झाले असून बीड जिल्ह्याची सुपुत्री स्वेता वाघमारे ही प्रथमच या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत असून तिने बीड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. स्वेताला अभिनयाची आवड असल्याने तिने या चित्रपटाकरिता ऑडिशन दिली. अनेक कलाकारांमधून तिची निवड झाली त्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून सर्व बीडकर जनतेने हा अतिशय सुंदर चित्रपट बघावा असे आवाहन स्वेता वाघमारे हिने केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like