Beed Minor Girl Gang Rape Case | बीड हादरले; अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड जिल्ह्यातील दिंद्रूड परिसरात अल्पवयीन मुलीवर (Beed Minor Girl Gang Rape Case) अत्याचाराची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दिंद्रूड पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा (Beed Minor Girl Gang Rape Case) तपास पोलिस करत असून या घटनेने दिंद्रूड परिसरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमधील माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड परिसरात एका शेतकऱ्याकडे एक कुटुंब सालगडी म्हणुन काम करते. रविवारी सकाळी आई-वडील शेतात कामाला गेले असता आरोपीने पिडीतेला ऊसाच्या शेतात ओढत नेले. तिथे तिच्यावर मुख्य आरोपीसह अन्य तिघांनी अत्याचार केला. यादरम्यान अत्याचार होत असताना एका महिलेने पिडीतेचे नग्न फोटो काढले असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे या घटनेबाबत अधिक संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका महिलेने दुसऱ्या महिलेचे अत्याचार होत असताना फोटो काढणे म्हणजे विकृतीचा कळस आहे असे म्हणत परिसरातून या घटनेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार दिंद्रूड पोलिस ठाण्यात एका महिलेसह चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींवर बाललैंगिक अत्याचार, ऍट्रोसिटी कायदा, कलम ३७६ नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या (Beed Minor Girl Gang Rape Case) घटनेनंतर दिंद्रूड पोलिस ठाण्याला तात्काळ भेट देत
उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस डॉ. धीरजकुमार यांनी तीन आरोपींना अटक केली.

या घटनेबाबतची  कारवाई दिंद्रूड पोलिस ठाण्याच्या
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभा पुंडगे आणि त्यांच्या टीमने केली आहे.
पिडीत मुलगी ही १७ वर्षाची अल्पवयीन असल्याने या घटनेबाबत दिंद्रूड परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
तसेच या घटनेनंतर महिला सुरक्षेच्या मुद्दावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title :- Beed Minor Girl Gang Rape Case | 5 accused tortured a 17 year old girl after her parents went to work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; बस चालक जागीच ठार

Aaditya Thackeray | घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान दिले, पण त्यांनी… – आदित्य ठाकरे

Hina Khan | ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर हिना खानने सोडले मौन ; म्हणाली “आगामी वेब सिरीज…”