शहरवासियांना स्वच्छ अन् वेळेवर पाणी पुरवठा करा : आ.संदिप क्षीरसागर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भल्या पहाटे पासनुच आ.संदिप क्षीरसागर हे शहरात नागरिकांच्या मुलभूत प्रश्नी रस्त्यावर असतात. नागरिकांनी शेवाळयुक्त गढुळ पाण्याचा घाण वास येत असल्याच्या तक्रारी त्यांच्या कानी टाकल्या. यावर तात्काळ माजलगावहून बीडला पाणी पुरवठा करणार्‍या ईट जवळील जलशुध्दीकरण केंद्रास भेट देत शहरवासियांना स्वच्छ अन् वेळेवर पाणी पुरवठा करा, त्यात कसलीही कुचराई होवू देवू नका असे आ. संदिप क्षीरसागर यांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकार्‍यांना सांगितले. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, नगरसेवक यांच्यासमवेत जलशुध्दीकरण केंद्राची व अमृत अटल योजनेच्या कामाची पाहणी केली.

शुक्रवारी (दि. 22) दुपारी आ. संदिप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, गटनेते फारुख पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे, खदीरभाई जवारीवाले, जयतुल्ला खॉन, बाळासाहेब गुंजाळ, प्रभाकर पोपळे, शेख इकबाल, शेख आमेर, रंजित बनसोडे, भैय्या मोरे, अशफाक ईनामदार, अशोक वाघमारे, शेख मोसीन, विशाल घाडगे, नितीन गरड यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी पाणी पुरवठा अभियंता राहुल टाळके, पाणी पुरवठा विभागाचे दुधाळ यांनी जलशुध्दीकरण केंद्रा संदर्भातील माहिती सांगितल्यानंतर आ.संदिप क्षीरसागर यांनी शहरात गढुळ आणि शेवाळयुक्त पाणी येत असून त्याचा घाण वास येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असून शहरात स्वच्छ व वेळेवर पाणी मिळणे गरजेचे आहे. शहरवासियांना स्वच्छ व वेळेवर पाणी पुरवठा करा, त्यात कसल्याही प्रकारची कुचराई नको, असे सांगितले यावर संबंधित अधिकार्‍यांनी शेवाळयुक्त पाणी येत असल्याचे कबुली देत यावर तातडीने उपाययोजना करुन दोन दिवसात पाणी पुर्ववत व स्वच्छ पाणी पुरवठा होईल याची खबरदारी घेतली जाईल, असे सांगितले.

यावेळी माजी आ.सय्यद सलीम यांनीही शहर वासियांच्या पाण्याच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत. यावर पाणी पुरवठा विभाग गांभिर्याने घेत नाही. गढूळ व शेवाळयुक्त पाणी त्याचा वास येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे अशी खबरदारी घ्या, असे सांगितले. यावेळी बीड शहराची वाढीव लोकसंख्या लक्षात घेता सुरू असलेल्या अमृत अटल योजनेच्या कामाची उपस्थितांनी पाहणी केली. यावेळी पाणी पुरवठा विभागातील अनेक कर्मचार्‍यांनी आपल्या तक्रारी व्यथा आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडे मांडल्यानंतर यावर तातडीने तोडगा काढला जाईल असे सांगितले.

Visit : Policenama.com