सचिन तेंडूलकरनं दिलेल्या खासदार फंडातील ‘निधी’चा बीड नगरपालिकेत ‘गैरव्यवहार’ !

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – सचिन तेंडुलकर यांनी दिलेल्या खासदार फंडाच्या एक कोटी निधीत बीड नगरपालिकेने अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा गंभीर आरोप MIM चे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी केला आहे. सचिन तेंडुलकर यांनी दिलेल्या एक कोटीच्या खासदार फंडाचे काम न करताच पैसे उचलल्याचे निजाम यांनी सांगितले. जळगाव मधील घरकुल घोटाळ्यापेक्षा हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला.

येत्या काळात जळगाव मधील घरकुल घोटाळ्याप्रमाणे बीड मधील कोट्यवधीचा घोटाळा देखील समोर येईल. यासंबंधित औरंगाबाद उच्च न्यायालयाने विशेष लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, यामुळे गेल्या चाळीस वर्षापासून नगर परिषदेवर एक हाती सत्ता असणाऱ्या क्षिरसागर बंधूना मोठा धक्का असेल असेही शेख निजाम यांनी सांगितले.

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत 2010-11 पासून 2014-15 या कालवधीत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना राबवताना बांधकाम विभागाच्या निविदा शासनाच्या नियमाप्रमाणे नाहीत. ई-निविदा केल्या नाहीत असा ठपका ठेवण्यात आलेला आहे. तसेच वारंवार मागणी करुन देखील लेखा परिक्षणसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन दिली नाहीत. लेखा अधिकारी अनेकदा आले परंतू नगरपालिकेकडून सहकार्य करण्यात आले नाही अशी नोंद लेखा परीक्षणात असल्याचाही दावा करण्यात येत आहे. जनहित याचिकेवर सुनावणी करताना तीन आठवड्यात विशेष लेखा परीक्षण करुन अहवाल न्यायालयात सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत.

 

You might also like