धक्‍कादायक ! टपाल वाटून घरी गेलेल्या 38 वर्षीय पोस्टमनचा उष्माघाताने मृत्यू ?

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – टपाल वाटप करून घरी पोहचलेल्या 38 वर्षीय पोस्टमनचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना जिल्हयातील बनसारोळा येथे शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. उष्माघाताने पोस्टमनचा मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

विक्रम भीमराव गायकवाड (38, रा. बनसारोळा) असे मृत्यू झालेल्या पोस्टमनचे नाव आहे. गायकवाड हे गेल्या काही वर्षापासुन अनुकंपावर टपाल विभागात काम करत होते. नेहमीप्रमाणे शनिवारी ते टपाल वाटप करून दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरी पोहचले. काही वेळातच त्यांना खुप ताप चढला. त्यामुळे ते अस्वस्थ झाले. असहनिय त्रास होत असल्यामुळे त्यांना खासगी वाहनाने तात्काळ अंबाजोगाईला नेण्यात येत होते.

मात्र, वाटेमध्येच त्यांचा मृत्यू झाला. रूग्णालयात पोहचण्यापुर्वीच गायकवाड यांचा मृत्यु झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पुन्हा रूग्णालयात न नेता घरी आणले आणि त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले. त्यामुळे गायकवाड यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे सांगणे कठीण असले तरी त्यांचा मृत्यू हा उष्माघातानेच झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्यात सर्वत्रच उष्णतेची लाट आहे. त्यातुनच पारा जवळपास 43 अंशावर पोहचल्याने अनेकांचे हाल होत आहेत. अशातच टपाल विभागातील पोस्टमनचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

उन्हाळ्यामुळे डोळ्यांना उद्भवणारे आजार –

उष्मा वाढल्यामुळे डोळे कोरडे पडू लागतात. डोळ्यांची आग होणे, चुरचुरणे, डोळ्यांना टोचणे, पाणी येणे, असे त्रास त्यामुळे होऊ लागतात. डोळे येणे, चिकट होणे, जळजळ होणे, आग होणे, अशा प्रकारचे डोळ्यांचे आजार शक्यतो उन्हाळ्यात उद्भवतात.
उन्हाळ्यात प्रामुख्याने डोळ्यांना त्रास होणाऱ्या अतिनील किरणांमुळे पारदर्शक पटलास व नेत्रपटलास इजा होते. पारदर्शक पटलास होणाऱ्या इजेस फोटोकेराटिटिस असे म्हणतात. यामध्ये डोळा दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळा लाल होणे, अशा समस्या प्रामुख्याने जाणवतात. अतिनील किरणांमुळे मोतीबिंदू म्हणजे डोळ्यावर पांढरा पडदा येण्यासारखी समस्या उद्भवू शकते.

‘या’ कारणामुळे उन्हाळ्यात डोळ्यांच्या समस्या वाढतात –

डोळ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करणाऱ्या अश्रूंचं सतत बाष्पीभवन होत असतं. उन्हाळ्यात उष्ण हवा आणि आजूबाजूच्या रखरखीतपणामुळे ही प्रक्रिया वाढते आणि त्यामुळे डोळे कोरडे पडण्याची शक्यता असते. मोबाइल आणि संगणकाच्या अतिवापरामुळे त्यांचे डोळे आधीपासूनच कोरडे पडत असतात (ड्राय आय सिंड्रोम). त्यांना उन्हाळ्यात अधिक त्रास होतो.

डोळ्यांची निगा कशी राखाल ? –

भरपूर पाणी पिणे.
पुरेशी झोप घ्या.
डोळे सतत पाण्याने धुणे अतिशय चांगले आहे. त्याचबरोबर डोळ्यांवरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे गरजेचे आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तेवढेच ‘आय ड्रॉप’ घाला.
गॉगल आणि टोपीचा वापर करावा.
स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत.
डोळ्यांच्या संरक्षणासाठी चांगल्या सनग्लासेसचा वापर आवश्‍यक आहे.
पाण्यात पोहताना गॉगलचा वापर आवश्‍यक आहे. कारण तरणतलावात क्‍लोरिन व अन्य रसायने मिसळली जातात. तलावाबाहेर आल्यावर डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे.
तसेच ज्या व्यक्ती कॉन्टॅक्‍ट लेन्स वापरतात; त्यांनी आगीजवळ जाणे टाळावे. यामुळे कॉन्टॅक्‍ट लेन्सला उष्णतेचा परिणाम होऊन कॉर्नियाला इजा होऊ शकते