स्टंटबाजीचे फोटो अपलोड करण्याऐवजी अपघातग्रस्तांची मदत करा – पोलीस अधीक्षक पोद्दार

पत्रकार अमजद खान यांचा रूग्णसेवेबद्दल सन्मान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – गाडीवर स्टंटबाजी करून ते फोटो फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामवर अपलोड करून कोणी हिरो बनत नसतो. चांगल्या कामाचे फोटो अपलोड करा, अपघातग्रस्तांची मदत करून जखमींचा जीव वाचवा असे आवाहन पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी केले. अपघातग्रस्तांना मदत करणारे खरे हिरो आजचे सत्कारमुर्ती असल्याचे सांगुन पोद्दार यांनी पत्रकार अमजद खान यांच्यासह विनाअपघात सेवा करणार्‍या बसचालकांचा गौरव केला.
Beed
बीड येथील बलभीम महाविद्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, पोलिस विभाग व परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३१व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, मोटार वाहननिरीक्षक शंकर कराळे आदींच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बालरोगतज्ञ डॉ.राम देशपांडे तर मोटारवाहन निरीक्षक तळेकर, उपप्राचार्य संतोष उंदरे आदींची उपस्थिती होती. यावेळी रूग्णसेवक पत्रकार अमजद खान यांचा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. विना अपघात सेवा बजावलेले बसचालक सुभाष काळे, सखाराम बोराडे, सुभाष गवळी, सोनाप्पा पवार, अतिक शेख यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा –