खुशखबर ! आ. संदीप क्षीरसागरांच्या प्रयत्नातुन बिंदुसरा नदीचे संवर्धन, सुशोभीकरणाने शहराचं सौंदर्य वाढणार

मंत्री जयंत पाटील यांचे संबधीत विभागास आराखडा तयार करण्याचे निर्देश

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शहराच्या मध्य भागातुन बिंदुसरा नदी वाहते, या नदी पात्राला सध्या नाल्याचे स्वरूप झाले असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आता या बाबत चांगली बातमी असून आ. संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बिंदुसरा धरण पाली ते लोळदगाव पर्यंत बिंदुसरा नदीचे संवर्धन, पूर संरक्षक भिंत, आवश्यक त्या ठिकाणी केटवेयर बंधारे, सुशोभिकरण आणी पर्यटन दृष्ट्या हा भाग विकसित करावा अशी मागणी जलसमपदा मंत्री जयंत पाटील यांच्या करण्यात आल्यानंतर त्यांनी आराखडा तयार करण्याच्या सूचना संबधीत विभागास दिल्या आहेत. सदर कामांचा आराखडा तयार करून प्रत्यक्षात काम झाल्यानंतर बीड शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

बीड मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर जोमाने कामाला लागले आहेत. शहरात बिंदुसरा नदी पात्रात छोटे बंधारे, दगडी पुलाचे बांधारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाणारा बिंदुसरा नदीवरील पूल दुरुस्ती, केटवेयर बंधारे, उतरते दगडाचे पिचिंग, घाट बांधणे, खोलीकरण व नदी पात्र स्वछता, शहराच्या हद्दीत नदी किनारी सौर पथदिवे बसवणे, आवश्यक त्या ठिकाणी पूर संरक्षण भिंत बांधणे आदी बाबींचा विचार करून शहराच्या विकासात आणी सौंदर्यात भर पडेल व लगतच्या शेतीला सिंचनासाठी फायदा होहिल. याचा आराखडा तयार करून निधी देण्यात यावा अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मुंबईत केली आहे. यावर मंत्री जयंत पाटील यांच्याकडुन जलसंपदा लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जा. प्र बिंदुसरा प्रकल्प जलसंधारण, उपजिल्हाधिकारी सामान्य, मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन विभाग यांची एकत्र बैठक घेऊन आराखडा बनवण्याच्या सूचना मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.

पर्यटन, जलसंपदा, पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग एकत्र करणार पाहणी !
शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीपात्र परिसरातील विकास कामे करण्याचा आराखडा बनवताना पर्यटन विभागा काय जलसंपदा लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड, कार्यकारी अभियंता जा.प्र बिंदुसरा प्रकल्प जलसंधारण बीड, उपजिल्हाधिकारी सामान्य, पालिका नियंत्रक, बीड, नगरपालिका मुख्याधिकारी, कार्यकरी अभियंता सार्वजनिक बांधकाम या बरोबरच आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी याची प्राथमिक पाहणी करणार आहेत. कारण सर्व विभाग या कामाशी निगडित आहेत.

तज्ञव्यक्ती विशेष संस्थाचा असणार सहभाग
शहरातील नदी पात्रातील स्वच्छता, वृक्ष लागवड, संवर्धन, पूर संरक्षक भिंत सुशोभीकरण, दगडी पुलाचे पुनर्वसन नदीवरील पूल याबाबत आराखडा तयार करत असताना या क्षेत्राशी संबंधित तज्ञ व्यक्ती आणि मुंबई-पुणे येथील ज्या संस्थांनी अशा क्षेत्रात काम केले आहे, त्यांचा यामध्ये सहभाग राहणार आहे, त्यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे, त्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर अनेकांशी संपर्कात आहेत,यावरूनच त्यांची विकासासाठी असलेली तळमळ दिसून येत आहे

फेसबुक पेज लाईक करा –