×
Homeक्राईम स्टोरीBeed News : धक्कादायक ! मुलगा हवा यासाठी पत्नीला डांबून रात्रभर बेदम...

Beed News : धक्कादायक ! मुलगा हवा यासाठी पत्नीला डांबून रात्रभर बेदम मारहाण, पत्नीचा मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मुलगा व्हावा म्हणून पतीने पत्नीला केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. पतीने पत्नीला बांधून रात्रभर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला. मुलाच्या हव्यासापोटी स्वत:च्या पत्नीला बेदम मारहाण करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना औरंगपूर शिवारात घडली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.

राधा महादेव रेड्डे असे मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. दहा वर्षापूर्वी राधा यांचा विवाह गेवराई तालुक्यातील इरगाव येथील महादेव आसाराम रेड्डी (वय-36) याच्यासोबत झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. मात्र, आजारपणात 8 वर्षाच्या मुलाचा दोन वर्षापूर्वी मृत्यू झाला. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर एकुलता एक मुलगा दगावल्याने आता वंशाला दिवा हवा म्हणून पतीने दुसरे लग्न करण्यावरुन पती-पत्नीत भांडण झाले.

दुसरे लग्न करण्यापेक्षा मुलगा होण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करुन घेऊ असे पत्नी सुचवले. यासाठी बीडच्या डॉक्टरांनी तपासण्या करुन 30 हजार रुपये खर्च सांगितला. मूल होण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार, या संतापातून आरोपी पतीने पत्नीला रुग्णालयातच शिवीगाळ करुन भांडण केले. त्यानंतर घरी आल्यानंतर 4 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास महादेवने पत्नी राधाचे हायतपाय बांधून लाकडी दांड्यकाने जबर मारहाण करुन निघून गेला. जखमी झालेल्या राधाने शेजारच्या महिलांना हाक मारुन दवाखान्यात नेण्याची विनंती केली. जास्त रक्तस्त्राव झाल्याने दवाखान्यात नेत असताना राधाचा मृत्यू झाला.

ही माहिती मिळताच राधाच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी महादेव रेड्डे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयाने 8 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Must Read
Related News