Beed News | पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – वनविभागात वन रक्षक (Forest ranger) म्हणून काम करणा-या एका तरुणाने पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide ) केली आहे. बीड जिल्ह्यातील (Beed News) आष्टीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह चौघांवर आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अनिल आबासाहेब जगताप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी अश्विनी अनिल जगताप, अजिनाथ देवराव भवर, विजुबाई अजिनाथ भवर, आणि महेश अजिनाथ भवर आदी चौघावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह

आष्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अनिलचा विवाह 2014 साली अश्विनी हिच्यासोबत झाला होता. अवघ्या दहा दिवसातच ते दोघे अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी शिरुर कडा येथे राहण्यासाठी गले होते.
त्यानंतर दोघा नवरा – बायकोत सातत्याने वाद होऊ लागला.
लग्नाअगोदरच्या पगारच्या खर्चाचा हिशोब मागू लागली.
तसेच तुमच्या आई-वडिलांना पैसे द्यायचे नाही असेही तिने बजावले.
त्यानंतर आई-वडिलांना घरासमोर फरशी करण्यासाठी पैसे दिल्यामुळे अश्विनीने अनिलला मारहाण देखील केली होती.
याबाबत अश्विनीच्या आई-वडिलांना कळवले असता त्यांनी मुलीची बाजू घेतली होती. 3 वर्षापूर्वी अनिल बदलीमुळे आष्टीत स्थायिक झाला.
त्यानंतर अश्विनीने जमीन नावावर करुन दे, असा तगादा लावत त्याचा शारीरिक अन् मानसिक छळ सुरु केल्याचा आरोप अनिलच्या वडिलांनी केला आहे.

Google ने न्यूयॉर्कमध्ये उघडले जगातील पहिले रिटेल स्टोअर

यंदा मे महिन्यात अश्विनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे कारण सांगून माहेरी गेली.
अनिलने वारंवार फोन करुनही तिने परत येण्यास नकार दिला.
जमीन आणि प्लॉट नावावर केल्याशिवाय येणार नाही, असे तिने बजावले.
अखेर सततच्या छळाला कंटाळून 28 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना 29 मे रोजी उघडकीस आली.
घटनेनंतर पोलिसांनी अनिलच्या वडिलांचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार तपास चालू होता.
अखेर तपास पूर्ण झाला ज्यात अनिलच्या मृत्यूला पत्नी आश्विनी जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Beed News man commits suicide after being harassed by his wife

हे देखील वाचा

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Nationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका