‘महाराष्ट्र राज्यात ओबीसी नेत्यांना बदनाम करून राजकारणातून संपवलं जातंय’

बीड : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचे आरोप झाल्याने राजकारणात खळबळ उडालीय. याप्रकरणी भाजपने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यभर आक्रमक आंदोलने सुरू केलीत. तसेच अनेक मोठ्या नेत्यांनी उघडपणे धनंजय मुंडे यांची बाजू घेण्याचं टाळलंय. मात्र, आता राज्यातील ओबीसींचे महत्त्वाचे नेते मानले जाणारे बाळासाहेब सानप (balasaheb sanap) यांनी याप्रकरणात गंभीर आरोप केलाय.

’महाराष्ट्र राज्यात ओबीसी समाजातील नेत्यांना बदनाम करून राजकारणातून संपवलं जातंय,’ असं वक्तव्या बाळासाहेब सानप यांनी बीडमध्ये केलंय. ’महाराष्ट्र राज्यात कोळी समाजाला आरक्षणातून, शिक्षणातून, नोकरीतून आणि राजकारणातून संपवण्याचे कट-कारस्थान ओबीसींच्या लक्षात आलंय. त्यामुळे आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणाराय, असा इशाराही बाळासाहेब सानप यांनी दिलाय.

मराठा समाजाची ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी होत आहे. केंद्रातील योजना, स्कॉलरशिप, नोकरी यात ओबीसी समाजाला वंचित ठेवण्याचे षडयंत्र आखलं जात आहे, असा आरोपही सानप यांनी यावेळी केलाय.

ओबीसींवर अन्याय होत आहे, हे काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या लक्ष्यात येतंय. मात्र, महाराष्ट्रातील नेत्यांच्या लक्ष्यात कसे येत नाही? असा सवालही बाळासाहेब सानप यांनी ठाकरे सरकारला केलाय.