पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा, म्हणाल्या -‘बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचं हित माहित आहे, आम्ही…’

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने औषधे व आरोग्य सुविधांची टंचाई अधिक भेडसावू लागली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे. त्यातच कोरोना बाधित रुग्णांना लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा जाणूव लागला आहे. या सऱ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलून बिड जिल्ह्याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. हे पत्र ट्विट करताना पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली आहे.

बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. याकडे पंकजा मुंडे यांनी आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. हे पत्र ट्विट करताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, रेमडेसिवीरचा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विनंती आहे, जातीने लक्ष घालून इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे. राज्य सरकारला आलेल्या दोन लाखांपैकी बीडलाही पुरेशी लस मिळाली पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असे म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नामोल्लेख करत टीका केली आहे.

काय म्हटले पत्रात ?

बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 719 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 34 हजार 989 असली तरी त्यातील 30 हजार 478 रुग्ण बरे झाले आहेत. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसीवरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जावत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकारने रुग्ण्संख्या वाढीत भर पडत आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारला आलेल्या दोन लाख लसी पैकी बीडला राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत केवळ 20 लसी मिळाल्या आहेत ही अतिशय खेदजनक बाब आहे. याकडे आपण गांभिर्याने लक्ष घालून पुरेसे Vaccine उपलब्ध करुन द्यावेत व तशी व्यवस्था आपण करावी आणि संबंधित यंत्रणेला सूचना करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.