परळी येथून मोदींच्या सभेहून परतताना पोलिस व्हॅनचा भीषण अपघात, 15 पोलिस जखमी, 5 गंभीर (व्हिडिओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परळी येथे आले होते. परळी येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या नियोजनासाठी बीड यथून गेलेल्या दंगल प्रतिबंधक गाडीचा परतताना सिरसाळा येथे अपघात झाला. या अपघातात गाडीचे चालकासह 10 ते 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


चालक अशोक बन्शी कदम, जीवन गगांवणे, आकाश यादव, भयासाहेब निर्सगंध, अमोल राउत असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर बाकी जखमींना माजलगाव येथील प्राथमिक रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे.
Beed Police
परळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या सुरक्षेसाठी बीड येथून दंगल प्रतिबंधक दलाचे एक पथक गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा संपल्यानंतर दंगल प्रतिबंधक दलाचे पथक बीडकडे परत होते. सिरसाळा येथे पोलिसांची व्हॅन आली असता चालकाचे गाडीवरील निंयत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटली. यामध्ये दहा ते पंधरा पोलीस जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Beed Police
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी पोलिसांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी