home page top 1

उपविभागीय अधिकार्‍याच्या डीबी पथकाकडून वाहन चोरी करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड पोलिसांनी वाहन चोरी करणार्‍या एका मोठया रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 6 वाहनं देखील जप्‍त केली आहेत. उपविभागीय अधिकार्‍याच्या डीबी ए पथकाने ही कारवाई केली आहे. पुण्यातून चोरलेला टेम्पो हा चर्‍हाटा फाटा येथे आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातून चोरलेला टेम्पो चर्‍हाटा फाटा येथे मिळला. पुर्वीचा वाहन क्रमांक काढुन टाकुन नवीन नंबर टाकुन हा टेम्पो वाहतूक करीत होता. उपविभागीय अधिकार्‍याच्या डीबी ए व पोलिस उपनिरीक्षक काझी, पोलिस हवालदार शेख सलिम, तुषार गायकवाड यांना याबाबत माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिस पथकाने टेम्पोसह अंकुश मिसाळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली.

पोलिसांनी एकुण दोन टेम्पो, दोन ट्रॅक्टर, एक मिनीबस, एक टाटा सुमो, एक पिकअप आणि एक बुलेट जप्‍त केली आहे. ही सर्व वाहने चोरीची असल्याचे तपासात निष्पन्‍न होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी वाहन चोरी करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक काझी, सहाय्यक उपनिरीक्षक शेख जहुर, शेख सलीम, तांबारे, राऊत, फिरोज पठाण, जगताप आणि उजागरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे

Loading...
You might also like