बीड जिल्ह्यातील ‘त्या’ कला केंद्रावर पोलिसांचा छापा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड पोलिस दलातील अनैतिक मानवी वाहतुक विरोधी पथकाने (एएचटीयु) केज येथील एका कला केंद्रावर गुरूवारी मध्यरात्री छापा टाकला. छाप्यात 62 हजार रूपायाचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे. कला केंद्राच्या चालकासह मॅनेजरविरूध्द खटला दाखल करण्यात आला आहे.

विना परवाना कला केंद्र चालविले जात असल्याबाबतची माहिती बीड पोलिस दलातील एएचटीयुला मिळाली होती. पोलिस उपाधिक्षक रोशन पंडित, पोलिस उपनिरीक्षक भारत माने, महिला पोलिस उपनिरीक्षक राणी सानप आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गुरूवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कला केंद्रावर छापा टाकला. त्यावेळी तेथे काहीजण आढळुन आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तसेच तेथुन 62 हजार रूपयाचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे. कला केंद्राच्या चालक, मालक आणि मॅनेजरविरूध्द खटला दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –

पालघर पुन्हा हादरले ; आजपर्यंतचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का

९ पोलीस निरीक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

पुणे / सासवड : ‘या’ कारणासाठी ऋषिकेश माईणकर याच्या खुन्याला सर्वोच्च न्यायालयाने दाखविली दया