Beed Suicide News | किराणा सामान उधार दिले नाही म्हणून मानसिक त्रासाला वैतागून मालकाने उचलले टोकाचे पाऊल

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड (Beed Suicide News) जिह्यातील धारूर तालुक्यातील कान्नापूर मोहा या ठिकाणी मानसिक त्रासाला वैतागून एका दुकानदाराने आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अविनाश अशोक देशमुख Avinash Ashok Deshmukh (वय वर्ष 32 राहणार कानपूर तालुका धारूर) असे मृत दुकानदाराचे नाव आहे. मृत अविनाश यांचे कानपूर या ठिकाणी एक किराणामालाचे दुकान आहे. याच गावातील स्वप्निल रामकिसन देशमुख (Swapnil Ramkisan Deshmukh), सुरज रामकिसन देशमुख (Suraj Ramkisan Deshmukh), सुमित्रा रामकिशन देशमुख (Sumitra Ramkishan Deshmukh) यांना अविनाशने किराणा सामान उधार दिले नाही. यामुळे त्यांच्या मनात किराणा चालक अविनाश देशमुख याच्या विरोधात राग होता. याच रागातून आरोपी स्वप्निल रामकिसन देशमुख, सुरज रामकिसन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून मानसिक त्रास देत होते. यामुळे दुकानचालक अविनाश खूप वैतागले होते.
अखेर या सगळ्या मानसिक त्रासाला वैतागून अविनाशने स्वतःच्या शेतात जाऊन रात्री आठच्या सुमारास एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी मृत अविनाश यांचे भाऊ संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्वप्निल रामकिसन देशमुख,
सुरज रामकिसन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख, यांच्यावर शिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये (Shirsala Police Station)
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
कलम 306,504,506 नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title :- Beed Suicide News | man takes his own life in depression
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस
Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत