Beed Terrible Accident | बीडमध्ये रिक्षा आणि इनोव्हाचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Terrible Accident | केज-अंबाजोगाई रस्त्यावर (Kaij-Ambajogai Road) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. अ‍ॅपे रिक्षा (Ape rickshaw) आणि इनोव्हा कार (Innova Car) यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात (Beed Terrible Accident) दोन गंभीर जखमी झाल्याची (Beed Crime) माहिती समोर येत आहे. जखमींवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

अपघातानंतर (Beed Terrible Accident) इनोव्हा गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात घुसली. तर दुसरी गाडीही समोरुन आणि साईडवरुन पूर्ण फुटली आहे. धडक झाल्यानंतर ही गाडीही रस्त्याच्या कडेला गेली. अपघातात जखमी झालेल्या काही जणांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. काही लोकांनी तात्काळ धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले.
दरम्यान काही तासांपूर्वी नाशिक येथे भीषण अपघात झाला होता.
ही घटना ताजी असतानाच बीडमध्ये भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
दोन मोठ्या अपघातामुळे गुरुवार भीषण अपघातांचा वार ठरला आहे.

 

Web Title :- Beed Terrible Accident | 6 killed on the spot in beed accident rickshaw and innova car

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या विरोधात FIR

 

Restaurant Service Charges | रेस्टॉरंटमध्ये खाणार्‍यांसाठी खुशखबर, सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे स्वस्त झाले लंच-डिनर

 

ACB Trap On PSI Yogesh Dhikale | 1 लाखाची लाच घेताना फौजदार अँटी करप्शनच्या जाळ्यात