गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरीला गेला मोबाइल, तरुणाने केली आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल वाजवणाऱ्या तरुणाचा 10 हजार रुपयांचा मोबाइल चोरीला गेल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

बीड शहरातील बलभीम चौक परिसरात राहणारा आकाश हा ढोल वाजवण्याचे काम करत होता. बुधवारी शहरांमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ढोल वाजवत असताना अज्ञात चोरट्याने आकाशच्या खिशातील दहा हजार रुपयांचा मोबाइल चोरला. यामुळे आकाशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे. पोलिस मोबाइल चोरांचा शोध घेत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात अनेकांच्या मोबाइलवर चोरट्यांनी डल्ला मारला.

दरम्यान, मोबाइल चोरीला गेल्याच्या क्षुल्लक कारणांमुळे स्वतःला संपवून घेणे धक्कादायक आहे. मोबाइलच वाढते प्रेम जिवघेणे ठरू शकते, हे या घटनेने दाखवून दिले आहे. मात्र, मोबाईल चोरीला गेल्यामुळे आत्महत्या केल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.