बीडमध्ये पुन्हा ‘अटीतटी’चा ‘सामना’ ! DM यांची प्रतिष्ठा पणाला तर PM यांच्या खेळीनंतर कोण ठरणार ‘किंग मेकर’ ?

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीनंतर बीड जिल्हा परिषदेची अध्यक्ष पदाची निवडणूक चर्चेची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. येत्या 4 जानेवारीला जिल्हा परिषद आणि सभापतीची निवड होणार आहे. त्यामुळे बीडचे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य निवडून येऊन देखील पंकजा मुंडेनी राजकीय खेळी करत अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवत बाजी मारली होती.

भाजपने शिवसेना, शिवसंग्राम, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाच बंडखोर अशी राजकीय खिचडी करत सत्ता समीकरण जुळवले होते. पण विधानसेभेच्या निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडीने सरकार स्थापन करताच धनंजय मुंडेदेखील जिल्हा परिषद ताब्यात घेण्याच्या तयारीला लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे आता नव्याने कामाला लागल्या आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भात त्यांनी महत्त्वूपर्ण बैठक घेतली. विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाले असले तरी बीडची जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात राहिल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी यापूर्वी बोलून दाखवला आहे. भाजप आपल्या 26 सदस्यांना घेऊन सहलीवर आहे. तर 23 सदस्य घेऊन राष्ट्रवादी सुत्र जुळवत आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी भाजपमध्ये रस्सी खेच सुरु आहे. यामध्ये सारिका डोईफोडे, योगीनी थोरात यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार संदीप क्षीरसगार यांच्या मातोश्री रेखाताई क्षीरसागर, आशा दौंड यांची नावे चर्चेत आहेत. धनंजय मुंडे यांनी चाचपणी सुरु आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी समीकरण जोडण्यासाठी धावपळ सुर केली असून त्यात घोडे बाजारही जोरात सुरु आहे.

असे आहे संख्याबळ
भाजप -17
अपक्ष-निंबाळकर -1
शिवसंग्राम – 4
शिवेसना -4
काँग्रेस -2
मुंदडा गट – 1
रामदास बडे – 1
एकूण -30
राष्ट्रवादी – 23
अपात्र सदस्य – 5
पोट निवडणूक -2
एकूण संख्याबळ – 60

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/