‘खाकी’च्या निगराणीखाली गोमांस तस्करी!

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – संगमनेरात गोवंशाची कत्तल करून हजारो टन गोमांस दर आठवड्याला अकोले शहरातून मुंबईच्या दिशेने “खाकीच्या” निगराणीखाली मोठ्या सुस्थितीत पार्सल केले जात आहे. अकोलेतील कायद्याचे रक्षकच गोमांसाचे भक्षक होत असल्याने हप्तेखोर “साहेबांना” रंगेहाथ धडा शिकवण्याचा निर्णय शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आहे.

संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची हत्या केली जात आहे. मात्र पोलीस प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे गोवंशाची कत्तल सुरूच आहे. कत्तल केलेल्या गोवंशाचे मांस मुंबईतील हॉटेल चालकांना पार्सल करण्यासाठी “मधल्या मार्गाचा” वापर केला जात आहे. राज्यात गोमांस विक्रीला बंदी आहे. त्यात हिंदू समाज गोवंशाची पूजा करीत असल्याने नागरिकांच्या गोवंशाप्रती मोठ्या श्रद्धा आहेत. मात्र लाचार आणि हप्तेखोर प्रशासन नागरिकांच्या या श्रद्धेला तिलांजली देत ट्रकच्या ट्रक भरून गोमांस मुंबईच्या दिशेने रवाना करीत आहे.

हे गोमांस नाशिक मार्गे पाठविणे जिकिरीचे असल्याने अकोलेमार्गे गाड्या गेल्यास कुणाला काहीच कळत नाही.याशिवाय संगमनेरातील हे मांस विक्रेते संगमनेर अकोले पोलीस ठाण्यातील साहेब लोकांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे लोकांच्या भावनांशी खेळत साहेब लोक दीड दोन दमडीसाठी लाचार होऊन रात्रीच्या वेळी या गाड्या सोडून देत आहेत.दर आठवड्याला एक मोठी गाडी मुंबईच्या दिशेने हे गोमांस घेऊन रवाना होते.ही गाडी कोणत्या दिवशी किती वाजता येणार हे खाकी वर्दीला आधीच माहीत असते.

त्यामुळे रात्र पाळीचे पोलीस कर्मचारी कळस किंवा सुगाव फाट्याजवळ येऊन गाडी अडवितात व आपला मलिदा ताब्यात घेऊन गोमांसाची गाडी बिनबोभाटपणे सोडून देतात.अकोले शहरातून होणाऱ्या या गोमांसाच्या तस्करीची कुणकुण हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना लागली आहे.त्यामुळे हे तरुण रात्रीच्या वेळी पाळत ठेऊन देखील आहेत. त्यामुळे कदाचित येत्या काही दिवसांत अकोले शहरात या गोमांसावरून मोठा राडा होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

तडजोड करून ट्रक सोडला
ऐन दिवाळीच्या दिवशी अकोले शहरातून पोलिसांच्या मध्यस्थीने गोमांस वाहून नेणारी एक ट्रक मोठी आर्थिक तडजोड करून सोडून देण्यात आली. सायबाला गोमांसाची गाडी सहीसलामत सोडण्यासाठी 80 हजार रुपयांचा हप्ता संगमनेरातून सुरू आहे.आठवड्यातून एकदा गोमांस घेऊन जाणाऱ्या या गाडीत हजारो टन गोमांस असते.मात्र ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’असे म्हणत हा गोरखधंदा जोरातच सुरू आहे.गोमांस तस्करीची ही घटना अकोलेकरांना ज्ञात असून अकोलकर जरा ही “खुळे” नाहीत,हे पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावे.अन्यथा नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास प्रशासनाला मोठे रोषाला सामोरे जावे लागेल.

Visit : Policenama.com