WhatsApp, Signal, Telegram सारख्या 15 अ‍ॅप्सवरील मेसेजेसना एकाच APP वरून द्या रिप्लाय !

पोलीसनामा ऑनलाईन – सध्या प्रत्येक जण कमीत कमी दोन किंवा तीन मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर करत आहेच. यात प्रत्येक अ‍ॅप्सवर जाऊन प्रत्येक वेळी मेसेज वाचणे शक्य होत नाही. परंतू आता काळजी करू नका यासाठी ‘बीपर’ नावाचे एक भन्नाट अ‍ॅप आले आहे. या अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्हाला 15 पेक्षा अधिक मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स एकाच ठिकाणी ठेवता येणार आहे. महत्वाचे म्हणजे हे अ‍ॅप युझर्सना मोफत मिळणार नाही. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी युझरला दर महिन्याला 10 डॉलर्स म्हणजेच जवळपास 750 रूपये मोजावे लागणार आहेत.

 

 

 

 

 

या अ‍ॅपच्या मदतीने युझरला फेसबुक मेसेंजर, सिग्नल, ट्विटर, टेलीग्राम, व्हॉट्सअ‍ॅप सारखे 15 मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स एकाच ठिकाणी मॅनेज करण्याची सुविधा मिळणार आहे. हे अ‍ॅप सेंट्रल हब प्रमाणे काम करते. तसेच या अ‍ॅपची महत्त्वाची बाब म्हणजे बीपरमध्ये आयमेसेजचाही वापर करता येणार आहे. या याव्यतिरिक्त हे अ‍ॅप अँड्रॉईड, विंडोज आणि लिनक्सवर काम करते. याच्या माध्यमातून युझर्सना सर्वच अ‍ॅप्स एकाच प्लॅटफॉर्मवर वापरता येणार आहे. यावर गुगल हँगआऊट, आयमेसेज, इन्स्टाग्राम, आयआरसी. मॅट्रिक्स, फेसबुक मेसेंजर. सिग्नल, स्काईप, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, ट्विटर, स्लॅक अशा अनेक अ‍ॅप्सचा सपोर्ट आहे. Eric Migicovsky यांनी हे अ‍ॅप विकसित केले आहे. यापूर्वी हे अ‍ॅप NovaChat या नावाने ओळखले जात होते.