दूधापेक्षा ‘बियर’ पिणे जास्त फायद्याचे, PETA च्या दाव्यानं लोक झाली ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याला लहानपणापासूनच दूध पिण्याच्या फायद्यांविषयी सांगितले जाते. मात्र दूध पिण्यापेक्षा बीअर पिणे फायदेशीर आहे असा दावा पेटा पीपल्स फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ़ अ‍ॅनिमल्स (PETA) ने म्हटले आहे. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अहवालाच्या आधारे पेटाने हा दावा केला आहे. मात्र, या दाव्यानंतर मोठी चर्चा रंगली आहे.

पेटाच्या म्हणण्यानुसार, दुधापेक्षा बिअर पिणे अधिक फायदेशीर आहे. बिअर केवळ हाडे मजबूत बनवते असे नाही तर आयुष्य देखील वाढते. पेटा लोकांना दूध न पिण्यास सल्ला दिला आहे. इतकेच नाही तर पेटाने दूध पिण्याचे अनेक तोटेदेखील उघड केले आहेत. असे सांगितले गेले आहे की दुधामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि कर्करोग यांसारखे घातक रोग देखील होतात.

बिअरला अल्कोहोलयुक्त पेय मानले जाते. ते बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये पुष्कळ पोषक तत्त्वे आढळतात. बियर तयार करण्यासाठी बार्ली, गहू, कॉर्न आणि तांदूळ यांचा वापर केला जातो. इतकेच नाही तर बिअरमध्ये 90 टक्के पाण्याव्यतिरिक्त फायबर, कॅल्शियम, लोहासह शरीराला फायदेशीर असे अनेक पोषक घटक आहेत.बिअर मानवी हाडे मजबूत करण्यासाठी देखील कार्य करते. शरीराच्या स्नायूंच्या विकासासाठी हे खूप फायदेशीर असल्याचेही म्हटले जाते.

पेटाने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, बिअर दुधापेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते, परंतु तरीही हे अल्कोहोल असलेले उत्पादन आहे. त्यामुळे जास्त बिअर पिणे देखील आरोग्यासाठी धोकादायक आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like