Beer Pack For Skin : बीयर पिण्याऐवजी स्किनसाठी करा तिचा वापर ! उन्हाळ्यात राहिल फ्रेश, जाणून घ्या फेस पॅक बनवण्याची पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Beer Pack For Skin : उन्हाळ्यात घाम आणि उन्हामुळे त्वचा खुपच डल आणि निस्तेज होते. अशावेळी सुंदर त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही बीयरचा वापर करू शकता. यामध्ये काही वस्तू मिसळून तयार केलेला फेस पॅक त्वचा ग्लोईंग बनवतो. त्वचेसाठी याचे फायदे, कृती आणि वापरण्याची पद्धत जाणून घेवूयात…

बीयरचा फेस पॅक

साहित्य-

बीयर- 1 चमचा

दही- 1 चमचा

जैतूनचे तेल -1 चमचा

एग व्हाईट -1

बनवण्याची पद्धत –

सर्व साहित्य एका भांड्यात घ्या. सर्व एकत्र चांगल्याप्रकारे मिसळल्यानंतर यामध्ये एग व्हाइट चांगले मिसळून घ्या. नंतर संपूर्ण चेहर्‍यावर आणि मानेवर फेस पॅक लावा. 15 मिनिटापर्यंत तो चेहर्‍यावर ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धुवून टाका.

बीयर फेस पॅकचे फायदे

1  बीयरने तयार केलेला फेस पॅक पूर्णपणे नॅचरल असतो. याचे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत.

2  बियर त्वचेची पीएच लेव्हर बॅलन्स करून आजार दूर ठेवते. यातील दह्यामुळे टॅनिंग कमी होते, तर जैतूनच्या तेलाने त्वचेचा ओलावा कायम राहतो. त्वचा चमकदार होते. रिंकल्सची समस्या दूर होते.

3 बियरमध्ये अँटी बॅक्टेरियल तत्व आढळतात यामुळे हा फेस पॅक त्वचेसाठी खुपच लाभदायक आहे.