दररोज खा बीट ! होतील असे फायदे ज्याचा विचारही केला नसेल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    अनेकांना बीट आवडत नाही तर काही लोक मात्र बीटाचं आवडीनं सेवन करतात.  गृहिणी देखील बिटाचे विविध पदार्थ तयार करतात. यात बीटाचा हलवा, बीटाची कोशिंबीर, बीटाची बर्फी असे अनेक पदार्थ आहेत. काही लोक सॅलड म्हणूनच बीट खाणं पसंत करतात.

बीट आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आज आपण याच्या फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

बीटाचं सेवन केल्यानंतर होणारे फायदे –

1) घशात जळजळ होत असेल तर बीटाचा रस प्यावा.

2) आम्लपित्त, पित्त होणं या समस्या दूर होतात.

3) मुळव्याधीच्या समस्येपासून आराम मिळतो.

4) रसक्षयापासून आराम मिळतो.

5) थकवा दूर होण्यास मदत होते.

6) हातापायात ताकद वाढते.

7) वजन कमी होतं.

8) जर दीर्घकाळापासून पांडु हा विकार असेल तर तो बरा होतो.

टीप –  वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.  प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.