पुराचे पाणी ओसरल्यानंतर विद्युत प्रवाह चालु करण्यापुर्वी ‘या’ 7 गोष्टींची काळजी घ्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरपरिस्थिती असल्याने अनेक ठिकाणचा विद्युत प्रवाह सध्या बंद आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर विद्युत प्रवाह चालु करण्यापुर्वी काळजी घेण्याचे आवाहन कोल्हापूरच्या अधीक्षक अभियंत्यामार्फत करण्यात आलेले आहे.

या गोष्टींची काळजी घ्या
1)
घराच्या आत जाण्यापूर्वी प्रथम आपल्या मीटरशेजारील मेनस्वीच बंद करावा.
2) घरातील सर्व स्वीच बंद असल्याची खात्री करावी.
3) घरचा विद्युत पुरवठा सुरू करण्यापूर्वी आपली विद्युत संचमांडणी तज्ञ माणसाकडून तपासून घेऊन योग्य असलेबाबत खात्री करून घ्यावी.
4) आपल्या सुरक्षतेसाठी अर्थींग योग्य असल्याची खात्री करून घ्या.
5) ELCB चा वापर करावा.
6) बरेच विद्युत अपघात हे विद्युत उपकरणात पाणी लागल्यामुळे शॉक बसून होतात,तसेच वायरींगमध्ये पाणी गेलेमुळे वायरींग शार्टसकीर्ट होण्याची शक्यता असते, त्यामुळे विद्युत उपकरणे व वायरींग तज्ञ माणसाकडून तपासून घेऊन नंतरच सुरु करावे.
7) विद्युत मोटर पंप तपासणी करूनच चालू करण्यात यावा.

आरोग्यविषयक वृत्त –