देश सोडण्यापूर्वी विजय मल्ल्या ज्येष्ठ भाजप नेत्यांना भेटला : राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतातील अनेक बँकांना हजारो कोटींना चूना लावून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने पळून जाण्यापूर्वी भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. आणि तशी कागदोपत्री नोंद आहे. मला त्यांची नावे घ्यायची नाहीत, असा खळबळजनक आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. लंडन येथे त्यांनी भारतीय पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. मोदी सरकारच्या दुर्लक्षितपणामुळेच मल्ल्यानंतर निरव मोदी, मेहुल चोक्सी बँकांना चूना लावून पळाले आहेत, असाही आरोप राहुल यांनी यावेळी केला.

भारतातील जेल सुस्थितीत असून येथे मल्ल्यासारख्या आरोपीला भारतात आणल्यास त्यास काहीही त्रास होणार नाही.भारतात सर्व गुन्हेगारांना समान वागणूक दिली जाते. येथे मल्ल्याला विशेष व्यवस्था देण्याचा प्रश्न नाही. सर्व कैद्यांना ज्या सुविधा आहेत त्याच मल्ल्याला येथे मिळतील. मोदी सरकार मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्या कठोर वागणार नाही. मोदी सरकारचे या लोकांशी संबंध असल्यानेच त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई होताना दिसत नाही, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.

[amazon_link asins=’B077PWBC7J,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’80730e55-a903-11e8-8f41-b13ecab6b907′]

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी लंडन येथे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसलाही संबोधित केले. या कार्यक्रमात ते म्हणाले, भारतात दलितांना काहीच मिळत नाही. हक्कासाठी आवाज उठवल्यास त्यांना मारहाण केली जाते. सत्ताधारी भारताला वेगळ्याच वाटेवर नेत आहेत. हातात हात घालून चालण्याच्या भारताच्या शक्तीला तोडण्याचे काम सुरू आहे. क्रोध आणि द्वेषाचे उच्चाटन करण्याची काँग्रेसमध्ये ताकत आहे. काँग्रेस देशाला अखंड ठेवण्यावर भर देते. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल यांनी आधी जग पाहिले, जगभर घडणाऱ्या घडामोडी आणि चळवळी पाहिल्या आणि भारताला पुढे नेण्यासाठी योगदान दिले. मी सत्तेत येण्यापूर्वी देशात काहीच झाले नव्हते, असे मोदी म्हणतात. अशावेळी ते भारतीय जनतेची टर उडवतात, माझ्या आजोबा-आजींवर टीका करतात. भारत झोपलेला हत्ती होता, मी आल्यावर त्याला जागे केले, असे ते लालकिल्ल्यावरून म्हणाले. यावरून त्यांचा अहंकार दिसून येतो. भारत कोण्या एखाद्या व्यक्तीने नव्हे तर भारतातील जनतेने घडवला आहे.

राहुल म्हणाले, गेल्या ७० वर्षात देशाचा जो काही विकास झाला. त्यात काँग्रेसचा थोडा का होईना पण हातभार लागला आहे. जनतेने हिंमत दाखवली, मेहनत घेतली आणि देशाचा विकास झाला. पण भाजपने सत्तेत आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि आरबीआयला कमकुवत करण्याचे काम केले आहे.

You might also like