तिकीटाची वाट नबघता विजयसिंहांनी सुरू केल्या मतदारांच्या भेटीगाठी

करमाळा (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर जिल्ह्यातील आणि सातारा जिल्ह्यातील काही भाग एकत्रित करून तयार झालेल्या लोकसभेचा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. या मतदारसंघातून २००९ मध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर २०१४ च्या निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत या मतदारसंघात विजयश्री खेचून आणली आहे. मात्र आता त्यांचेच तिकीट कापले जाण्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. प्रभाकर देशमुख यांचे नाव या मतदारसंघासाठी चर्चेत असून विजयसिंहांना उमेदवारी देण्यास पक्षांतर्गत विरोध असणारे ते प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.

विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज करमाळा तालुक्यातील काही गावांना भेट देवून तेथील सामान्य माणसांशी भेटीगाठी आणि बातचीत केली आहे.लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना त्यांचे काम करण्याचे ठोस आश्वासन देखील दिले आहे. या प्रसंगी त्यांनी सामान्य लोकांच्या आग्रहा खातर एका टपरीवर चहा देखील घेतला आहे. विजयसिंह हे सर्व सामन्यांमध्ये मिसळणारे नेते म्हणून सोलापूर जिल्ह्याला परिचित आहेत. त्यांना या वेळी उमेदवारी दिली तर त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो मात्र त्यांना तिकीट नदेता प्रभाकर देशमुख यांना जर उमेदवारी दिली गेली तर मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादीला दगा होण्याची शक्यता आहे असे राजकीय जाणकार म्हणतात.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीला माढा मतदार संघात उभा राहण्याचा धडा कोणाचा होत नव्हता तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या उमेदवारीचा विडा उचलला आणि मोदी लाटेत शरद पवारांची बूज राखली. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विजयसिंहांच्या विरोधात पक्षांतर्गत सुप्त हालचालींना सुरुवात झाली आहे. कधी बारामतीच्या पवार परिवारातील नाव चर्चेत येत आहे. या सर्व गनिमी काव्यात विजय कोणाचा होणार हे सांगणे आता अधिकच कठीण बनत चालले आहे. अशात मोहिते पाटील समर्थकांच्या चिंतेत वाढ होताना दिसते आहे.