भाईजान सलमानच्या आधी ‘या’ अभिनेत्यांना आली होती ‘दबंग’ची ‘ऑफर’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सलमान खानचा सुपरहिट चित्रपट सिरीज दबंगच्या तिसऱ्या पार्टची शूटिंग चालू आहे. चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसून येणार आहे. परंतु या चित्रपटासाठी पहिली पसंती सलमान खानला दिली नव्हती. हा चित्रपट पहिले या अॅक्टर्स ला ऑफर केला होता. परंतु त्यांचा नकार आल्यानंतर हा चित्रपट सलमान खानच्या खात्यात आला.

या वर्षी २० डिसेंबरला दबंग ३ प्रदर्शित होणार आहे. परंतु सलमान खानची सुपरहिट सिरीज पहिले रणदीप हुड्डा आणि इरफान खानला ऑफर केली होती. या गोष्टीची माहिती सलमानचा भाऊ अरबाज खानने दिली होती. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत अरबाजने सांगितले की, दबंगचे निर्देशक अभिनव कश्यपने चुलबुल पांडेसाठी इरफान खान नाहीतर रणदीप हुड्डाला घेऊन हा प्लॅन केला होता. परंतु काही होऊ शकलं नाही.

इरफान खान और रणदीप हुड्डा

अरबाज म्हणाला की, अभिनवने त्याला ‘मक्खी’ ची भूमिका ऑफर केली तर त्याने अभिनवला विचारले की, तो चुलबुलची भूमिका करण्यासाठी त्याला ऑफर का करत नाही. त्याने सांगितले की, तुला मक्खीची भूमिका चांगल्या प्रकारे जमेल आणि सोबतच ही भूमिका करण्यासाठी रणदीप हुड्डा किंवा इरफान खान यासाठी परफेक्ट असतील. त्यानंतर अरबाजने त्याला चित्रपट तयार करण्याची ऑफर दिली आणि इरफान – रणदीप कडून नकार आल्यामुळे सलमानला चित्रपटात घेण्याचा निर्णय दिला.

dabangg
अरबाजच्या या निर्णयाला अभिनवने होकार दिला. दबंग पासून सोनाक्षी सिन्हाने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते आणि आता दबंग-३ पासून साईं मांजरेकर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार महेश मांजरेकरची मुलगी साई मांजरेकर छोट्या चुलबूल पांडेसोबत रोमान्स करतांना दिसून येईल.