‘बॅकलेस’ ब्लाऊजमुळे Sara Ali Khan चर्चेत; ‘हे’ स्टार्स ही आऊटफिट्समुळे झाले आहेत ट्रोल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानमुळे नुकतेच सोशल मीडियावर वादळ निर्माण झाले जेव्हा एका विचित्र ‘बॅकलेस’ ब्लाऊजमध्ये त्यांनी स्वतःचे फोटो शेअर केले. त्यांच्या ब्लाऊजसाठी चाहत्यांनी साराला ट्रोल करण्यास सुरवात केली. लोकांनी त्यांची खिल्ली उडवली आणि काही युजर्सनी तुम्ही हे कसे परिधान केले हे विचारले. तथापि, साराने ज्या ब्लाऊजला घातले आहे त्याच्या मागे नेट आहे, परंतू फोटोमध्ये एडिट केल्यामुळे ते दिसत नाही. मनीष मल्होत्राने व्हिडीओ शेर केला आहे त्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे.

याआधीही बरेच सुपरस्टार्स त्याच्या विचित्र आउटफिटमुळे ट्रोलिंगचे बळी बनले आहेत. चला तर अशाच गोष्टी जाणून घेऊया.

ऐश्वर्या राय बच्चन
सारा आली खान यांच्यावर ट्रोल झाल्यानंतर त्या एक न्यूकमर आहेत असा विचार करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की ऐश्वर्या राय बच्चनसारख्या ब्युटीफुल डीवादेखील कपड्यांवरून ट्रोल झाल्या आहेत. ही गोष्ट आहे २०१६ ची आणि संधी होती कान्सचा रेड कार्पेट. ऐश्वर्याने स्मोकी आयजसह लवेंडर लिपस्टिक लावली होती आणि ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले गेले.

दीपिका पदुकोण
दीपिका अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या आपल्या चित्रपटांसाठी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक फी घेते. त्यांच्या आउटफिटसाठी त्याही एकदा ट्रोल झाल्या होत्या. त्यांनी इंडो-वेस्टर्न गोल्ड-रेड आऊटफिट घातले होते ज्यामध्ये सिल्वर चोकर नेक वापरले होते. पंख असलेल्या या आउटफिटसाठी या अभिनेत्रीवर जबरदस्त ट्रोल झाला.

मल्लिका शेरावत
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या चित्रपट निवडीवर आणि त्यामध्ये दिलेल्या बोल्ड सीनसाठी अनेकदा वादात राहिली आहे. तथापि, असा एक प्रसंग आला जेव्हा त्याच्या पोषाखासाठी त्यांना खूप ट्रोल केले गेले. मल्लिका एका कार्यक्रमात विचित्र ब्लॅक आउटफिटमध्ये गेल्या होत्या.

प्रियांका चोपडा
२०१७ मध्ये प्रियांका चोपडा मेट गाला येथे हलका तपकिरी रंगाचा सिल्क गाऊन परिधान करताना दिसल्या. बोल्ड रेड लिप्स आणि प्लेन थाय बन सोबत त्यांनी लेदर बूट घातले होते. तथापि, ट्रोलला सर्वात अधिक मनोरंजन करणारी गोष्ट म्हणजे प्रियांकाचा लॉंग वाइड गाऊन. यासाठी त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.

रणवीर सिंग
गोष्ट जेव्हा अतरंगी आउटफिट घालण्याची येते तेव्हा या रांगेत रणवीर सर्वात आधी येतात. या अभिनेत्याला त्यांच्या विचित्र ड्रेसिंग सेंससाठी ट्रोलिंगचा शिकार व्हावे लागले होते, परंतू ते नेहमी अशाच कपड्यात दिसून येतात.

श्रुती हसन
तसे तर श्रुती हसन यांचा ड्रेसिंग सेंस अप्रतिम आहे, परंतू त्या ही त्यांच्या कपड्यांना घेऊन ट्रोलिंगचा शिकार झाल्या आहेत. त्यांनी ब्ल्यू कलरमध्ये एक फेयरी गाऊन घातला होता, ज्यात सजावटीसाठी बीड्सचा वापर केला होता.

सोनाक्षी सिन्हा
सारा आली खानप्रमाणे एका कार्यक्रमात जेव्हा सोनाक्षी सिन्हा बॅकलेस सूट घालून पोहोचल्या तेव्हा हा फोटो जलद इंटरनेटवर व्हायरल झाला होता. लोकांनी या आउटफिटसाठी सोनाक्षीला जबरदस्त ट्रॉल केले होते.