Video : सुशांतच्या वाढदिवसापूर्वी रिया चक्रवर्तीनं खरेदी केली फुलं, फोटोग्राफर्सला पाहून हात जोडत म्हणाली…

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या निधनानंतर बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सतत चर्चेत येताना दिसली होती. नंतर ड्रग केसमध्ये रियाचं नाव समोर आल्यानंतरही ती खूप चर्चेत होती. आता सुशांतच्या वाढदिवसाच्या एक दिवसापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होताना दिसत आहे. यात मुंबईच्या रस्त्यावर रिया फुलं खरेदी करताना दिसत आहे. सोशल मीडिया युजर्स असा अंदाज लावत आहेत की, बहुतेक रियानं सुशांतसाठीच ही फुलं खरेदी केली आहेत.

 

 

 

 

 

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, रिया गाडीतून उतरते आणि बांद्राच्या रस्त्यावर फुलं खरेदी करते. तिच्या आजूबाजूला पैपराजी (सेलिब्रिटी फोटोग्राफर्स) देखील दिसत आहेत. रियानं त्यांना फोटो आणि व्हिडीओ घेण्यासाठी मनाई केली. ती म्हणाली, फुलं खरेदी करत आहे, जावा इकडून.

रियानं पांढऱ्या रंगाचे काही गुलाब खरेदी केले आणि आपल्या गाडीकडे जाऊ लागली. यावेळी ती पैपराजीला हात जोडताना दिसली. ती म्हणाली, आता माझा पिछा करू नका.

रियाचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तिलो नौटंकी म्हटलं आहे. एका युरनं लिहिलं की, याला प्रमोट का करता. एकानं तर असंही म्हटलं, आता ही फुलं खरेदी करत आहे. आता नवीन कोण आहे. काहींनी तिला सपोर्टही केला आहे. एकानं लिहिलं की, बस झालं आता, जाऊ द्याना.

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती चेहरे सिनेमात दिसणार आहे. चेहरे सिनेमात ती बिग बी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी अशा मोठ्या कलाकारांसोबत दिसणार आहे. याच सिनेमात क्रिस्टलही डिसूजाही दिसणार आहे. तसं पाहिलं तर तिचं करिअर काही खास नाही चाललं. मेरे डैड की मारुति, सोनाली केबल, जलेबी अशा सिनेमात लिड रोल करूनही रिया बॉलिवूडध्ये आपलं स्थान तयार करण्यासाठी झटत आहे.