‘त्यांनी’ भीक मागणे गुन्हा नाही ; कॅबिनेट मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तृतीयपंथीयांकडून मागण्यात येणारी भीक हा गुन्हा आहे अशी तरतूद ट्रांसजेंडर्स पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राइट्स) विधेयक, २०१९ या विधेयकात करण्यात आली होती. आता ही तरतूद काढून टाकण्यात आली आहे. या विधेयकाला कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हे विधेयक आता संसदेत सादर करण्यात येईल.

पहिल्या विधेयकानुसार ८ व्या कलमातील १९ व्या तरतुदीनूसार तृतीयपंथीयांनी भीक मागणे हा गुन्हा ठरवण्यात आला होता. या गुन्ह्यासाठी ६ महीन्याच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली होती. ही शिक्षा दोन वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकत होती. सामाजिक न्याय विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आता विधेयकातून भीक शब्द काढून टाकण्यात आला आहे. इतर माहिती सारखीच आहे.

तृतीयपंथीय समूहाने या तरतुदीवर आक्षेप घेत सांगितले होते की, सरकार तृतीयपंथीयांना रोजगाराचा पर्याय न देताच भीक मागण्यापासून थांबवत आहे. तृतीयपंथीय व्यक्तीला तृतीयपंथीय समूहाची मान्यता मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या ट्रान्सजेंडर कमिटीसमोर हजर राहणे अनिवार्य होते. विधेयकातून ही तरतूद देखील काढून टाकण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या