अहमदनगर : पगार नसल्याने कर्मचार्‍यांचे भीक मागो आंदोलन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार नाही. त्यामुळे शेवगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज शेवगावमध्ये भीक मागो आंदोलन केले.

शेवगाव नगरपालिकेची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून पगारच मिळाला नाही. अनेक वेळा कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला अर्ज विनंत्या करूनही पगार मिळत नाही. अखेर आज नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शेवगाव शहरातील आंबेडकर चौकामध्ये हातामध्ये फलक घेऊन महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी शेवगावच्या नगर रोडवर झोळी पसरून दुकानदारांना भीक मागितली.

दुकानदारांच्या दारोदार जाऊन यावेळी महिलांनी झोळी पसरून भीक मागितली. हे पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. नगरपालिका प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत लक्ष घातले नाही तर पुढील आंदोलन यापेक्षा उग्र करू, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like