‘लॉकडाऊन’मुळं जगण्याचे हाल ! ‘बेगुसराय’ मालिकेतील अभिनेत्याला अश्रू अनावर, म्हणाले- ‘300 रुपये दिले तरी खूप होतील’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  लॉकडाऊनमुळं अनेकांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. कारण काम नसल्यानं त्यांचं पूर्ण इनकम बंद आहे. टीव्ही सीरियल बेगुसराय मध्ये शिवांगी जोशीच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेता राजेश धरस यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी एक इमोशनल व्हिडीओ शेअर करत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. त्यांनी लोकांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

‘मला जगायचं आहे, मला मदत करा’

व्हिडीओत राजेश म्हणत आहेत की, जर मी लाजलो तर हे आयुष्य मला खूप महागात पडेल. मला एवढीच विनंती करायची आहे की, मला मदतीची खूप गरज आहे. अवस्था खूपच नाजूक झाली आहे. तुम्ही 300, 400, 500 रुपये जेवढे शक्य असतील मला मदत करा. शुटींग कधी सुरू होईल काहीच माहिती नाही. काम मिळेल किंवा नाही काहीच माहिती नाही. लाईफ एकदम ब्लॉक झाली आहे. काहीच समजत नाहीये. मला जगायचं आहे.” बोलताना त्यांचे डोळेही पाणावत आहेत. त्यांनी सोबत बँक खात्याचा तपशील आणि मोबईल नंबरही दिला आहे.

बेगुसराय या मालिकेचं प्रसारण 2015-16 सालच्या दरम्यान सुरू झालं होतं. या शोमध्ये श्वेता तिवारी आणि विशाल आदित्य सिंह असे कलाकारही दिसले होते.