Begusarai News : बिहारच्या कोर्टाकडून ‘प्रोड्युसर’ एकता कपूरला ‘समन्स’ ! 8 फेब्रुवारी रोजी व्हावं लागणार हजर

पोलिसनामा ऑनलाईन – फिल्म आणि टीव्हीची प्रोड्युसर एकता कपूर (Ekta Kapoor) आपल्या मालिकांसाठी खूपच फेमस आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजी (ALTBalaji) वरील तिची वेब सीरिज एक्स एक्स एक्स (XXX) मधील काही आक्षेपार्ह सीन्समुळं ती वादात सापडली होती. बिहारच्या बेगुसराय कोर्टानं तिला 8 फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर रहाण्यासाठी समन्स बजावलं आहे.

भारतीय जवानांचा अपमान करणं आणि त्यांच्या पत्नीवर आक्षेपार्ह सीरिज बनवणं असे आरोप एकतावर आहे. बेगुसराय कोर्टाचे न्यायाधीश राजीव कुमार यांनी बरौनी समिरिया आदर्श गावातील रहिवाशी माजी सैनिक शंभू कुमार यांच्याकडून दाखल तक्रार पत्र 524 (सी)/2020 वर सुनावणी करताना एकता कपूरवर लावलेली कलमं लक्षात घेता तिला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारदार शंभू कुमारनं बालाजी फिल्म प्रोड्युसर एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी XXX या सीरिजच्या दुसऱ्या सीजनमध्ये भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीच्या चारित्र्याला चुकीच्या पद्धतीनं दाखवलं आहे. यामुळं तक्रारदारासह इतर माजी सैनिकांना अपमानकारक आणि लज्जास्पद वाटत आहे. प्रोड्युसर एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी त्याच्या सीरिजमध्ये असं दाखवलं हे की, जेव्हा जवान सीमेवर त्याचं कर्तव्य बजावत असतो तेव्हा त्याची पत्नी परपुरुषासोबत संबंध ठेवते त्याला पतीची वर्दीही घालायला लावते.

या प्रकरणी तक्रारदार शंभू कुमार यांच्यासह माजी सैनिक राजाराम पोद्दार आणि अरूण कुमार सिंह यांनीही कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहून साक्ष दिली. तक्रारदाराकडून वकिल ऋषीकेश पाठक यांनी युक्तीवाद केला.