एस.टी.ची हंगामी दरवाढ मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एस.टी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामातील महसूल वाढीच्या उद्देशाने यंदा करण्यात आलेली हंगामी दरवाढ ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आली आहे. ६ नोव्हेंबर पासून एस.टी चे नियमित तिकिटदर आकारण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

यंदा दिवाळीच्या सुट्टीत २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत एसटीच्या साधी (परिवर्तन) , निमआराम (हिरकणी) व शिवशाही (आसन ) बससेवेसाठी मूळ तिकिटावर सरसकट १० % दरवाढ करण्यात आली होती. या दरवाढीमुळे दररोज सुमारे २ कोटी रुपये अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे. या काळात एसटीच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत प्रवाशांनी केलेल्या सहकार्याबद्दल एसटी महामंडळाने प्रवाशांचे हार्दिक आभार मानले आहेत.

Visit : Policenama.com