‘त्या’ महिला अधिकाऱ्यावरची ‘सक्त ताकीद’ची कारवाई मागे

पोलिसनामा इम्पॅक्ट

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

वाढदिवसाच्या निमित्त मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास मित्र-मैत्रिणी सोबत सेलिब्रेशन करणाऱ्या  आमदार पुत्रावर कारवाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर ‘सक्त ताकीद’ची कारवाई करण्यात आली होती. यावर सर्व प्रथम पोलिसनामा ऑनलाईन वर सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी ही सक्त ताकीद ची कारवाई मागे घेतल्याचे आदेश काढले आहेत.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a3d4ef61-86af-11e8-ba17-e3aec11a8ecf’]

वाढदिवस साजरा करण्यासाठी आमदार पुत्र मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसह दापोडी येथील पुलावर मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास आला. दरम्यान रात्र पाळीवर असलेल्या महिला अधिकारी त्या ठिकाणी गस्त घालत पोहचल्या. त्यावेळी त्यांनी आमदार पुत्रास या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यास मनाई केली. मात्र मी आमदाराचा मुलगा असून इथच वाढदिवस साजरा करणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी वाहन परवाना, कागदपत्रे मागितली मात्र ती घरी असल्याचे त्या पुत्राने सांगितले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला.

आमदारांनी वरीष्ठ पोलिसांना याबाबत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी खाते अंतर्गत चौकशी सुरू केली. यामध्ये महिला अधिकाऱ्याने आमदार पुत्रास कानाखाली मारली असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी कायदेशीर कारवाई न केल्याने त्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. याबाबत पोलिसनामा ऑनलाईन मध्ये सर्व प्रथम बातमी प्रसिद्ध करण्यात आली.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ac613363-86af-11e8-9f03-abd87eaae395′]

वरिष्ठ पोलिसांनी याची दखल घेत परत त्या महिला पोलीस अधिकाऱ्यास चौकशीसाठी बोलवले. त्या महिला अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकूण घेतले. चौकशी दरम्यान योग्य माहिती मिळाल्याने सक्त ताकीदची कारवाई मागे घेण्यात आल्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.