बेहमई हत्याकांड ! 38 वर्षांपूर्वी ‘फूलन देवी’नं एकाचवेळी 20 जणांना होतं ‘मारलं’, आता निर्णयाची ‘वेळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – च्या टोळीने 38 वर्षांपूर्वी 20 लोकांना लाईनीत उभे करून यमसदनी पाठवले होते. देशभरात चर्चेत येऊन गेलेल्या या हत्याकांडाबाबत चित्रपट देखील बनलेला आहे. याबाबतची सुनावणी 19 डिसेंबरला पूर्ण झाली होती. न्यायालयाने सहा जानेवारीला निकाल देणार असल्याचे सांगितले होते. आज येणाऱ्या निकालामध्ये बेहमईच्या लोकांना निकालाची अपेक्षा आहे.

यामध्ये मुख्य आरोपी असलेल्या फुलन देवी सह इतर 15 आरोपींचा मृत्यू झालेला आहे. जिल्हा सरकारी वकील राजू पोरवाल यांनी सांगितले की, 14 फेब्रुवारी 1981 रोजी फुलन देवीच्या टोळीने बेहमई गावावर हल्ला करत जगन्नाथ सिंह, तुळशीराम, सुरेंद्र सिंह, राजेंद्र सिंह, लाल सिंह, रामधर सिंह, वीरेंद्र सिंह, शिवराम सिंह, रामचंद्र सिंह, शिव बालक सिंह, नरेश सिंह, दशरथ सिंह, बनवारी सिंह, हिम्मत सिंह, हरिओम सिंह, हुकुम सिंह यांच्यासह 20 जणांची हत्या करण्यात आली होती.

जंटर सिंह समवेत सहा लोकांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. 35 – 36 डाकू आणि फुलन देवी विरोधात सिकंदरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. हा सर्व प्रकार काही दिवसांपासून संपूर्ण देशामध्ये चर्चेत आलेला आहे. 2012 मध्ये फुलन देवी समवेत भीखा, पोसा, विश्वनाथ, श्यामबाबू व राम सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते.

या हत्याकांडाच्या सुनावणीसाठी 38 वर्ष लागले. फिर्यादीने 2014 मध्ये साक्ष पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर आरोपींच्या वतीने प्रतिवादींनी त्यावर वकिलीला सुरवात केली. त्याचवेळी कोर्टाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे हे प्रकरण पुढे ढकलण्यात आले. डीजीसीने सांगितले की, या प्रसिद्ध हत्याकांडावर सोमवारी कोर्टाने निश्चित तारखेनुसार निर्णय द्यावा अशी अपेक्षा आहे.

तीन आरोपी जामिनावर तर एक जेलमध्ये –
डीसीसी राजू पोरवाल यांनी सांगितले की, बेहमई घटनेतील आरोपी भिखा, श्यामबाबू आणि विश्वनाथ उर्फ पुतानी जामिनावर बाहेर आहेत. आरोपी पोसा अजूनही तुरूंगात आहे. या घटनेत विश्वनाथ उर्फ अशोक, रामकेश आणि मान सिंह असे तीन जण फरार आहेत. त्यांना अद्याप पोलिस पकडू शकलेले नाहीत.

या आरोपींचा झाला आहे मृत्यू –
पोलीस रेकॉर्डनुसार बेहमई घटनेतील मुख्य आरोपी फुलन देवीची नवी दिल्ली येथे हत्या झालेली आहे. तसेच रामऔतार, मुस्तकीम, लल्लू बघेल, लल्लू यादव, रामशंकर, जग्गन उर्फ जागेश्वर, बलराम, मोती, वृंदावन, राम प्रकाश, रामपाल, प्रेम, नंदा उर्फ माया मल्लाह या सर्व साथीदारांचा देखील मृत्यू झालेला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/