‘पपला’कांड मध्ये पकडले 16 नामचीन ‘गुन्हेगार’ पोलिसांनी चक्क ‘अर्धनग्न’ करून काढली धिंड

राजस्था : वृत्तसंस्था – राजस्थान पोलिसांनी गुन्हेगारांना अर्धनग्न करुन भर शहरातून ओळख परेडीच्या नावाखाली त्यांची धिंड काढली. काही दिवसांपूर्वी अलवर जिल्ह्यातील बहरोड येथील पोलीस स्टेशनवर एके-४७ ने हल्ला करून या गुन्हेगारांनी पापा गुर्जर या कुख्यात गुन्हेगाराची सुटका केली होती. सर्व प्रयत्न करूनही पोलिस पापाला गुर्जर याला पुन्हा ताब्यात घेऊ शकले नाहीत, त्यानंतर राजस्थान पोलिसांनी अटक केलेल्या पापाच्या साथीदारांना अर्धनग्न करून त्यांची संपूर्ण शहरात मिरवणूक काढली.

भिवाडीच्या पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत, बहारोड भागात वाढलेली दहशत आणि लोकांच्या मनातील भीती कमी व्हावी या उद्देशाने ही धिंड काढल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी १६ गुन्हेगारांच्या ओळख परेडच्या नावाखाली या दरोडेखोरांची फिल्मी स्टाईलने धिंड काढली. यात त्यांना अर्धनग्न करून २ किलोमीटरपर्यंत चालत नेले.

शहरात कडक बंदोबस्तासहित हे दरोडेखोर फिरविण्यात आले. यावेळी, सशस्त्र पोलीस उपस्थित होते. बहोर भागात आलेल्या दरोडेखोरांची वाढलेली दहशत पाहून पोलिसांनी या दरोडेखोरांची मिरवणूक काढली आहे. या मिरवणुकीमधून पोलिस हा संदेश देत आहेत की, गुन्हे करून दहशत माजविणाऱ्या आणि लोकांना त्रास देणाऱ्या बदमाशांची हीच स्थिती केली जाईल.

अलवर जिल्ह्यातील बहरोड पोलिस ठाण्यात हरियाणाच्या कुख्यात गुन्हेगार विक्रम उर्फ पपला गुर्जरचा याची सुटका करत अज्ञात हल्लेखोरांनी एके AK ४७ चा हल्ला करून तेथून पळ काढला. पपला गुर्जर यांना पळवून लावण्यास मदत करणार्‍या १६ बदमाशांना पोलिसांनी पकडले आहे. या सर्व गुन्हेगारांना बेहरर स्कूल मैदान ते बहरोड पोलिस स्टेशनपर्यंत रस्त्याने नेण्यात आले.

पोलिसांनी त्यास शिंकखाती परेड असे नाव दिले आहे. भिवडीचे पोलिस अधीक्षक अमनदीप कपूर म्हणाले, ‘या प्रकरणात पोलिस आणि तपास एजन्सी एसओजी यांनी आज शिंघाटी परेड आयोजित केली आहे. बाजारातून बदमाशांनी ज्या मार्गाने पळ काढला होता ते पाहून बाजारपेठेत ही ओळख पटवली गेली आहे, जर गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली तर ती चांगली गोष्ट आहे.’

Visit – policenama.com 

You might also like