पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून इंजिनिअर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. उमेदवार आधिकृत वेबसाइटवरुन या पदांसाठी अर्ज करु शकतात. बीईएलमध्ये एकूण 19 इलेक्ट्रॉनिक आणि मॅकेनिकल इंजिनिअर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार 2 नोव्हेंबर 2019 किंवा त्याआधी ऑनलाइन अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख
2 नोव्हेंबर 2019 ही अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अंतिम तारीख असणार आहे, या आधी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करत येईल.

पदांचे नाव आणि संख्या
1. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर – 13 पदे
2. मॅकेनिकल इंजिनिअर – 6 पदे

येथे करा अर्ज
जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करु इच्छित आहेत त्यांना http://www.bel-india.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
शहर – बंगळुरु
राज्य – कर्नाटक

शैक्षणिक पात्रता
या पदांवर भरतीसाठी जनरल आणि ओबीसी वर्गाचे उमेदवारांकडे मान्यता प्राप्त संस्थामधून इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन किंवा मॅकेनिकलमध्ये बीई किंवा बीटेक फर्स्ट क्लाससह पास असणे आवश्यक असेल.

एसी-एसटी आणि विक्लांग उमेदवारांना पास क्लास देखील चालेल. हे पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. याशिवाय उमेदवाराला संबंधित क्षेत्रात कमीत कमी 6 महिने अनुभव असावा.

असा करा अर्ज
इच्छुक उमेदवार 2 नोव्हेंबर 2019 पूर्व बीईएलच्या bel-india.in च्या माध्यमातून अर्ज करु शकतात. इतर पद्धतीने अर्ज करता येणार नाही.

अर्ज करण्यासाठी ही कागदपत्र आवश्यक 

1. निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व्हॅलिड ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर
2. बीई, बीटेकचे स्कॅन सर्टिफिकेट
3. अनुभव प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी
4. एसी एसटी, विकलांग उमेदवारांसाठी जातीचे प्रमाण पत्राची स्कॅन कॉपी. ही सर्व कागदपत्र वेबसाइटवर अर्ज करताना अपलोड करावे लागतील.

Visit : Policenama.com