Bela Bose Passed Away | ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाईन : ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे सोमवारी निधन (Bela Bose Passed Away) झाले. त्या 79 वर्षांच्या होत्या. बेला बोस यांनी आपला अभिनय आणि नृत्य याच्या जोरावर 60-70 च्या दशकात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री व नृत्यांगना इतपतच त्यांची ओळख मर्यादित नव्हती. कवयित्री, उत्तम चित्रकार आणि उत्तम जलतरणपटू अशीदेखील त्यांची ओळख होती. (Bela Bose Passed Away)

बेला बोस या मूळच्या कोलकात्यातील आहेत. एकेकाळी बेला बोस आणि त्यांचे कुटुंब आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईत येऊन स्थायिक झाले. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर एक नृत्यांगना म्हणून बेला यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यावेळी ‘मै नशें मै हूँ’ या 1959 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात राज कपूर यांच्याबरोबर एका गाण्यातील नृत्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. यादरम्यान त्यांनी बंगाली रंगभूमीवर काम करत अभिनय शिकून घेतला. यानंतर 1962 साली ‘सौतेला भाई’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा गुरू दत्त यांची नायिका म्हणून मुख्य भूमिका मिळाली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी जवळपास दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Bela Bose Passed Away)

बेला बोस यांचे काही गाजलेले चित्रपट
बिमल रॉय दिग्दर्शित ‘बंदिनी’, ‘प्रोफेसर’, ‘शिकार’, ‘आम्रपाली’, ‘उमंग’, ‘दिल और मोहब्बत’, ‘जिंदगी और मौत’
या चित्रपटामधील बेला बोस यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच ‘जय संतोषी माँ’ या गाजलेल्या पौराणिक चित्रपटात त्यांनी साकारलेली खलनायकी भूमिका आजही अजरामर आहे. बेला बोस यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Web Title :- Bela Bose Passed Away | veteran actress dancer bela bose passed away at the age of 79 mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त देसाई 10 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची भव्य पदयात्रा