बेलारुस : मला गोळ्या घालून ठार करा आणि निवडणूक घ्या, राष्ट्राध्यक्ष संतापले

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बेलारुस या पूर्व युरोपातील देशामध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये हस्ताक्षेप केल्याचा विरोध करत येथील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी विरोध करणार्‍यांना स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला आहे. मी जिवंत असे पर्यंत पुन्हा निवडणुका होणार नाहीत. मला गोळ्या घाला आणि निवडणुका घ्या असं लुकाशेन्को यांनी सांगितलं आहे.

निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्षांनी हस्ताक्षेप केल्याचा आरोप करत पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एकीकडे पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली जात असतानाच दुसरीकडे लुकाशेन्को यांच्याविरोधात निवडणूक लढवणार्‍या 37 वर्षीय प्रतिस्पर्धी स्वेतलाना तिखानोवस्काया यांनी आपल्या मुलांच्या जिवाला धोका असल्याचे सांगत देश सोडला आहे. पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली जात असल्याचे सांगत राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी पुन्हा निवडणूक होणार नाही असे ठामपणे सांगितले आहे. जोपर्यंत तुम्ही मला संपवत नाहीत तोपर्यंत पुन्हा निवडणूक होणार नाही.

जोपर्यंत तुम्ही मला गोळी मारत नाही तोपर्यंत निवडणूक होणार नाही, असे लुकाशेन्को यांनी स्पष्ट केले आहे. मात्र लुकाशेन्को यांच्या या वक्त्यावाला विरोध करणार्‍यांनी गांभीर्याने घेतलेले नाही. 65 वर्षीय लुकाशेन्को हे सहाव्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडूण आले आहेत. त्यांना युरोपमधील शेवटचे हुकूमशहा म्हणून ओळखले जाते. जगभरातील अनेक संस्थांनी बेलारुसमधील निवडणूक निष्पक्षपणे पार पडली नसल्याची टीका केली आहे.