Belgaum Corporation Election result | बेळगाव महापालिकेत भाजपचा झेंडा, BJP स्पष्ट बहुमतात

बेळगाव : वृत्तसंस्था – Belgaum Corporation Election result | कर्नाटकासह पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Belgaum Municipal Corporation Election) भाजपने बाजी मारली आहे. नुकतंच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरु आहे. पुढं आलेल्या निकालाच्या माहितीनुसार बेळगाव महापालिकेत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काही वेळआगोदर भाजप (BJP) आघाडीवर होते. तसेच भाजपचे साधारण 8 उमेदवार निजयी झाले आहेत. दरम्यान, निकालानुसार महाराष्ट्र एकीकरण समिती-4. भाजप-8 काँग्रेस-4 अपक्ष-5 आणि एमआयएम-1 असे उमेदवार निवडुन आले आहेत.

निवडणुकीच्या मतमोजणीस (Belgaum Municipal Corporation Election) सुरुवात होताच महाराष्ट्र एकीकरण समिती (Maharashtra Unification Committee) आपलं पहिलं खातं उघडलं. नंतर, त्यांचे 4 उमेदवार निवडुन आले आहेत. प्रथम महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शिवाजी मंडोळकर विजयी झाले आहे आहेत. वॉर्ड क्रमांक 14 मधून त्यांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक 27 मधून रवी साळुंखे विजय आणि वार्ड क्रमांक 19 मधून अंकुश केसरकर विजयी झालेत. आतापर्यंत 58 पैकी 4 जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीनं विजयी पताका फडकावला आहे.

दरम्यान, एकूण 58 जागांसाठी मतदान पार पडलं. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजप 55, काँग्रेस 45 JDS 11, आम आदमी 37, AIMIM 7, अन्य 2 आणि अपक्ष 217 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

हे देखील वाचा

Phone Tapping case | वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्लांचं ‘एफआयआर’ मध्ये नावचं नाहीय

Pune Incident | ब्रेक फेल झाल्याने चारचाकीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार दुचाकीसह थेट खोल दरीत, कात्रज घाटातील घटना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Belgaum Corporation Election result | belgaum election result bjp clear majority in belgaum municipal corporation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update