जीवावर उदार होऊन त्याने ग्रेनेड झेलून वाचविले २० सहकाऱ्यांचे प्राण

बेळगाव : वृत्तसंस्था – सीआरपीएफची गाडी मणिपूरमधील मार्केटमधून जात असताना नक्षलवाद्यांनी ग्रेनेड फेकत असल्याचे पाहून त्या जवानाने गाडीतून उडी घेतली आणि तो ग्रेनेड गाडीवर पडण्याअगोदर झेलला. त्यात त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली खरी पण त्याचवेळी आपल्या २० सहकारी जवानांचे प्राण वाचविले.

गोकाकचा सुपूत्र शहीद जवान उमेश हेलवारे असे या शूर जवानांचे नाव आहे. त्याच्या या शौर्याला सलाम करीत सोमवारी गोकाक येथे त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या या शौर्याची कहानी त्यांचे पार्थिव घेऊन आलेल्या सहकाऱ्यानी साश्रु नयनाने व्यक्त केली.

चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलास मारहाण, पोलिसावर गुन्हा दाखल

गोकाकचे सुपूत्र उमेश हेलवारे हे गेल्या ४ वर्षांपासून सीआरपीएफच्या मणिपूर विभागात सेवा बजावत होते. मणिपूरमधील मार्केटमधून शनिवारी सीआरपीएफची गाडी गस्त घालत जात होती. त्यावेळी नक्षलवाद्यांनी या गाडीला लक्ष्य करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला. हे दिसताच उमेश हेलवारे यांनी गाडीतून बाहेर उडी मारली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी एक ग्रेनेड गाडीच्या दिशेने डागला होता. ते पाहून उमेश हेलवारे पुढे झाले व त्यांनी गाडीवर पडणारा हा ग्रेनेड जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर झेलला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पण हा ग्रेनेड गाडीवर फुटला असता तर त्यात आतील २० जवान दगावले असते.

वीरमरण प्राप्त झाल्यावर खास विमानाने सोमवारी सकाळी त्यांचे पार्थिव बेळगावला आणण्यात आले. शासकीय इतमामात गोकाकमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

जाहिरात