बेळगावात भाजपा-काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढाई दिसत आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनाही मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.

भाजप नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने बेळगाव लोकसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीत भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगल अंगडी रिंगणात होत्या. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाच्या मंगल अंगडी आघाडीवर आहेत. त्यांना 72 हजार 967 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे सतीश जरकीहोळी हे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना 68 हजार 921 मते मिळाली आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 19 हजार 305 मते मिळाली आहेत.