बेळगाव पोटनिवडणुकीत बाजी कोण मारणार? युवा शुभम शेळके, मंगला अंगडी यांच्यात चुरस, आज फैसला

बेळगाव : वृत्तसंस्था – बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज शनिवारी दि. १७ एप्रिल रोजी मतदान सुरु आहे. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यामुळे बेळगावमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत असून, या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके, भाजपकडून मंगला अंगडी आणि काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी हे उमेदवार उभे आहेत. याचबरोबर आणखी ७ उमेदवारही रिंगणात आहेत. तर या पोटनिवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर या निवडणुकीत बाजी कोण मारणार? याचा फैसला आज होणार आहे.

कोरोनाचाच संसर्ग वाढत असल्याने नियमाची दक्षता घेऊन हि निवडणूक पार पाडली जाणार आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे निवडणूक कर्मचार्‍यांनी शुक्रवारी सकाळी निवडणूक साहित्य घेऊन दुपारीच मतदान केंद्रांवर हजर झाले आहेत. तर आज सकाळी ७ वाजता सुरु झालेल्या मतदानाची वेळ सायंकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे. येथील मतदार हे जवळपास १८ लाख आहेत. मतदानावेळी प्रत्येक मतदाराची थर्मल टेस्ट करूनच मतदान केंद्रात सोडले जाणार आहे. तर चाचणीवेळी एखाद्या व्यक्तीला ताप असेल तर त्याची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. त्या टेस्टमध्ये चाचणी सकारात्मक आल्यास त्यांना सायंकाळी ६ ते ७ असा अखेरचा १ तास हा पीपीई किट घालून मतदान करवून घेता येणार आहे.

या निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचार्‍यांना येथील बी. के. मॉडेल हायस्कूल आणि क्लब रोडवरील वनिता विद्यालय हायस्कूलच्या मैदान येथे निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदार याद्या, मतपेट्या, शाई आदी साहित्य घेऊन कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी रवाना झाले. निवडणुक कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या महिला आपल्या लहान मुलांसह उपस्थित होत्या. तसेच. जल्हाधिकारी डॉ. हरिश कुमार, म्हणाले, सुरक्षित वातावरणात निवडणूक घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मतदानाच्या वेळेतील शेवटचा १ तास कोरोनाबाधितांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. पाचहून अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी CRPF चा बंदोबस्त असणार आहे. तसेच, पोटनिवडणुकीसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकूण ३२० संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी २ हजार ९०० पोलिस बंदोबस्तात तैनात केले आहेत. तर मतदारांनी कोरोनाची दक्षता घेत निर्भयपणे मतदान करावे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले आहे.