‘या’ खतरनाक श्‍वानाने शोधलं होतं ओसामा बिन लादेनला, आता करणार दिल्‍ली मेट्रोची सुरक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली मेट्रोच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआयएसएफ) ने बेल्जियन मालिनोइज ब्रीडचा नवीन श्वान खरेदी केला आहे. या जातीच्या कुत्र्यानेच २०११ मध्ये अमेरिकेच्या नेवी सील टीमला पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याला शोधण्यास मदत केली होती. सीआयएसएफ ने मागील आठवड्यात एका खासगी ब्रीडर कडून हा श्वान खरेदी केला आहे. यानंतर आता त्याला प्रशिक्षण दिले जाणार असून मेट्रो स्थानक आणि विमानतळांवर सैन्याच्या मदतीसाठी त्याला तैनात केले जाणार आहे.

सीआईएसएफ ने या श्वानाला १० महिन्याच्या प्रशिक्षणासाठी बेंगळुरू मधील डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या श्वानाच्या खरेदीला आणि प्रशिक्षणासाठी एकूण १ लाख रुपये आतापर्यंत खर्च झाला आहे. या पथकातील हा सर्वात महागडा सदस्य झाला आहे.

DMRC उचलणार खर्च –

दिल्ली मेट्रो आणि दिल्ली एअरपोर्ट वरील सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ सांभाळत आहे. त्यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणी बॉम्बशोधक पथकात आणि ड्रग्ज सापडण्याची अशा जमातीच्या श्वानांची गरज असते. त्यामुळे या श्वानाच्या खरेदीचा आणि प्रशिक्षणाचा सर्व खर्च दिल्ली मेट्रो रेल कॉरपोरेशन (DMRC) करणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like