तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायद्याचं पण ‘या’ गोष्टींचं मोठं नुकसान, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – तांब्याच्या भांड्यामधे जेवण करणे नक्कीच फायद्याचे ठरते त्यामुळे जुन्या काळातील अनेक लोक तांब्याच्या भांड्यांचा वापर जास्त प्रमाणात करायचे. तांब्याच्या भांड्यांचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. त्यामुळे आज आपण तांब्याच्या भांड्यांच्या बाबतच्या अशा गोष्टींची माहिती घेणार आहोत ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत माहीतच नसतील.

तांब्यांच्या भांड्यांनी काय होतो फायदा ?
तांब्यामध्ये स्टरलाइजिंग गुण आहे, त्यामुळे जेव्हापण तांब्याच्या संपर्कात काही खाण्याचे पदार्थ किंवा पाणी येते तेव्हा त्यातील किटाणू मरून जातात. त्यामुळेच तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने अनेक आजार देखील बरे होतात.

PunjabKesari

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे सगळ्यात फायदेशीर
पाण्यासोबत तांब्याची रासायनिक प्रतिक्रिया पार पडते, ज्यामध्ये यात अँटी बॅक्टरीयल, अँटी इंफ्लामेंटरी आणि कॅन्सरविरोधी प्रॉपर्टीज निर्माण होतात यामुळेच ताब्यातील पाणी पिल्याने अनेक आजार नाहीसे होतात.
PunjabKesari

पाण्याला करते फिल्टर
सध्या दूषित पाण्याचे अनेकदा मोठे संकट उभे राहते मात्र तांब्याच्या भांड्यातील पाणी स्टरलाइजिंग गुणामुळे थोड्या प्रमाणात का होईना शुद्ध होऊन बाहेर पडते. त्यामुळे इन्फेक्शन सारखा आजारापासून ताब्यातील पाणी व्यक्तीला दूर ठेवण्यास मदत होते.

PunjabKesari

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे
ताब्यातील गुनसत्वांमुळे फॅट बर्न व्हायला मदत होते.
ताब्यातील भांड्याने पाणी पिल्याने थायरोक्सिन हार्मोन नियंत्रणात राहते. जे कि थायरॉइडसाठी फायद्याचे ठरते.
जेवणासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर केल्याने बुद्धी तल्लख होते.
तांब्याच्या भांड्यांचा वापर केल्याने रक्त प्रवाह नियंत्रित राहतो आणि हृदय देखील चांगले राहते.
तांब्याच्या भांड्यांचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केल्याने पचन प्रक्रिया सुधारते.
तांब्यामुळे एंटी-एजिंगच्या समस्या दूर होतात आणि त्वचा साफ होते.

PunjabKesari

या गोष्टी खाल्ल्याने होईल नुकसान
तांब्याच्या भांड्यातील जेवण केल्याने जसे फायदे होतात तसेच तांब्याच्या भांड्यातील काही पदार्थ खाल्ल्याने नुकसान देखील होते. सिट्रिक फूड्स,लोणचे, दही, लिबचा रस, ताक इत्यादी पदार्थ तांब्याच्या भांड्यातून खाऊ नहेत.

ठेवा स्वच्छता
तांब्याची भांडी नेहमी स्वच्छ ठेवा जेणेकरून कॉपर ऑक्साइडची बर त्यावर येणार नाही कारण असे झाल्यास ते शरीरासाठी हानीकारण ठरू शकते. जर असे झाल्यास भांड्यात टाकलेल्या पाण्याचा संपर्क ताब्याशी होत नाही आणि तुम्हाला जसेच्या तसे पाणी प्यावे लागते.

भांडी वापरताना घ्या ही काळजी
जास्त तर घरांमध्ये तांब्याच्या जगांचा आणि ग्लासाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र जर हे जमिनीवर ठेवले तर याचा तुम्हाला कोणताच फायदा मिळणार नाहो त्यामुळे जमिनीचा आणि तांब्याचा संपर्क येणार नाही अशा प्रकारे ही भांडी ठेवा.

फेसबुक पेज लाईक करा –