रोज 1 चमचा आवळ्याचा मुरांबा खाल तर आजारी पडणं विसरून जाल ! जाणून घ्या 4 आश्चर्यकारक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आवळा एक असं फळ आहे ज्याला 100 गुणांचं औषध मानलं जातं. डॉक्टरही याबद्दल सांगत असतात. आवळ्याला वंडर फूड, अमृत असंही संबोधलं जातं. यामुळं अनेक आजार मुळापासून नष्ट होतात. यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, आयर्न, कॅरोटीन आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतं. खास करून महिलांच्या आरोग्यासाठी याचा खूप फायदा होतो. याचा मुरांबा तर डोळ्यांच्या खूपच चांगला असतो. आज आपण आवळ्याच्या मुरांब्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

1) त्वचा – आवळ्याचा मुरांबा खाल्ल्यानं त्वचा चमकदार दिसते आणि सुरकुत्याही कमी होतात. त्वचेवरील मुरूम, सतत तोंड येणं याशिवाय इतरही अनेक रोग यामुळं दूर होतात.

2) पचनक्रिया सुधारते – यामुळं पचनक्रिया सुधारते. तुम्ही आवळ्याचा मुरांबा रोज एक चमचा खाल्ला तर आंबट किंवा करपट ढेकर आणि गॅसची समस्याही लगेच दूर होते. पोट साफ होतं. सर्दी खोकलाही यानं गायब होतो. भूक वाढते.

3) हृदयासाठी फायदेशीर – आवळ्यात असणारं क्रोमियम हे हृदयासाठीसुद्धा खूप लाभदायक असतं. यामुळं तुमचं हृदय अगदी मजबूत आणि निरोगी राहतं. यामुळं बॅड कोलेस्ट्रॉल नष्ट होतं आणि गुड कोलेस्ट्रॉल तयार होतं. रक्त शुद्ध होण्यास मदत होते. यासाठी नियमित आवळ्याचा मुरांबा खायला हवा.

4) हाडं आणि सांधे – आवळ्याच्या मुरांबाच्या सेवनानं हाडं मजबूत होतात. सांधेदुखी दूर होते. आहारात रोज एक चमचा याचं सेवन करा.