‘इम्युनिटी’ वाढवण्यासाठी प्या नारळपाणी ! पण लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या 9 फायदे

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळपाणी चांगला पर्याय आहे. यामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, मिनरल्स, इलेक्ट्रोलाइट्स अँटीऑक्सीडेंट्स, अमीनो-अ‍ॅसिड, एंजाइम्स आणि खनिज पदार्थ आढळतात, जे शरीराला पोषण देतात. आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. हे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. ग्लुकोज लेव्हल नियंत्रणात राहते. परंतु, तुम्हाला हे महित आहे का की याचे तोटे सुद्धा आहेत. जाणून घेवूयात याच्या सेवनाचे फायदे आणि तोटे…

हे आहेत फायदे

1 पाण्याचे कमतरता दूर करते.
2 इलेक्ट्रोलाइट्स काय ठेवणे आणि मुलांचे पोषण करते.
3 गरोदर महिलांसाठी लाभदायक. छातीत जळजळ, मळमळणे, बद्धकोष्ठतेवर उपयोगी.
4 डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, काविळ आणि डायरियासह उल्टी या समस्येत उपयोगी.
5 ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत देते. इम्युनिटी वाढवते.
6 पचनक्रिया मजबूत होते.
7 सर्दी, तापापासून मुले दूर राहतील.
8 मुतखडा, हृदयरोग, मेटाबॉलिज्म ठिक ठेवते.
9 डायबिटीज, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी लाभदायक.

हे आहेत तोटे

1 ज्यांना किडनी किंवा हृदयाचे आजार असणार्‍यांसाठी नुकसानकारक आहे.
2 ज्यांना नारळपाण्यामुहे अपचन आणि पोट फुगण्याचा त्रास होतो त्यांनी टाळावे.
3 यात पोटॅशियम आढळते. युरीनद्वारे आपल्या शरीरात असलेले अतिरिक्त पोटॅशियम बाहेर पडते. ज्या लोकांच्या किडनीमध्ये हे पोटॅशियम थांबते त्यांना किडनी स्टोनची समस्या होते.
4 जर पोटॅशियमची मात्रा रक्तात वाढली तर हृदयाचे ठोके अनियमित होतात. अशावेळी नारळपाणी पिऊ नका.