फक्त 1 ग्लास हळदीचे पाणी प्याल तर राहाल ‘निरोगी’, ‘सर्दी-खोकला’च नव्हे तर व्हायरसच्या संसर्गापासूनही दूर

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या प्रसार वाढत असतानाच आता पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. कारण कोरोना संसर्गाची बाधा होईल म्हणून सगळ्यांनाच आजारी पडायची भीती वाटत आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या हळदीचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले फायदे तुम्ही जाणून असचालच. हळदीच्या पाण्याचे रोज सेवन केल्याने तुम्ही सगळ्या आजारांपासून दूर राहू शकता. चला मग जाणून घेऊया हळदीच्या पाण्याचे फायदे.

१. सूज कमी करण्यासाठी

हळदीमध्ये असलेल्या करक्युमिन नावाच्या रसायनामुळे शरीराची सूज कमी करण्यास मदत होते. शरीरावर कितीही सूज असली, तरी हळदीचे पाणी प्यायल्यास ती कमी होते. त्याव्यतिरिक्त करक्युमिनमुळे सांधेदुखी दूर करण्यासाठी मदत होते.

२. हृदय सुदृढ राहते.

हळदीच्या सेवनाने हृदय सुदृढ राहते. तसेच हळदीच्या पाण्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत. रक्त साफ होण्यासाठी मदत होते. त्याशिवाय रक्तांच्या धमन्यांमध्ये सुद्धा रक्त साठत नाही. हळदीचे पाणी देखील हृदय निरोगी राखण्याचे काम करते. हळदीच्या पाण्याच्या सेवनाने शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत राहतो.

३. पचनक्रिया व्यवस्थित राहते.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती अनेक जण घरात बसून काम करत आहेत, त्यामुळे शरीराची पुरेशी हालचाल होत नाही. तसेच अन्नपचन देखील व्यवस्थित होत नाही. तुम्हाला सुद्धा अशी समस्या निर्माण होत असेल तर हळदीच्या पाण्यामुळे जेवणाचे पचन चांगल्या प्रकारे होते. तसेच पोटाविषयीच्या आजारांपासून संरक्षण होते. पचनक्रिया उत्तम राहावी यासाठी दररोज हळदीच्या पाण्याचे सेवन करावे.

४. सर्दी, खोकल्यासारख्या समस्या उद्भवत नाहीत

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करावे. तसेच हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी, फ्लू सारख्या विषाणूंपासून संरक्षण होते. याबरोबरच या विषाणूंपासून लढण्यास शरीरास मदत होते. त्यामुळे कोरोना संसर्गासोबत जगत असताना तुम्हाला आजारापासून लांब राहायचे असेल तर नेहमी सकाळी उठल्यावर गरम पाण्यात हळद मिसळून या पाण्याचे सेवन करा.