‘पेरू’ खाण्याचे अनेक फायदे, तज्ज्ञांनी सांगितले, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पेरु हे अनेकांचं आवडतं फळ आहे. तिखट मीठ लावलेले पेरु खाण्याची मजा काही वेगळीच आहे. पेरु म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लाल, हिरवे पेरु पाहताक्षणी लक्ष वेधून घेतात. पेरुमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस आमि लोह असतं. अशा पोषक घटकांनी युक्त पेरु खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो. तज्ज्ञांनी सांगितले की, पेरु खाण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. जाणून घेऊयात पेरु खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात.

पोटाच्या विकारांमुळे आराम

चुकीचा आहार घेतल्याने पोटासंबंधी समस्या वारंवार उद्भवतात. यावर उपाय म्हणून पिकलेल्या पेरुच्या फोडी मीठ लावून खाव्यात. यामुळे पोटदुखी बरी होते. पेरुच्या बिया पोट साफ करण्यास मदत करतात.

पोट साफ होते

अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. अशा व्यक्तींनी नाश्त्यामध्ये दररोज पेरु खाल्ला पाहिजे. बद्धकोष्ठतेची समस्या जात असल्यास सकाळी आणि संध्याकाळी पेरु खाणं गरजेचं आहे.

गॅस ॲसिडीटीवर प्रभावी

गॅस, ॲसिडीटीची समस्या उद्भवत असल्यास पेरुच्या बिया प्रभावी ठरतात. या बिया काढून त्यात गुलाबाचे पाणी आणि खडीसारखेसह घेतल्यास ॲसिडीटी कमी होते. त्यामुळे गॅस आणि अपचनाची समस्या देखील दूर होते.

रक्ताची कमतरता भरुन निघते

पेरुमध्ये आयर्न आणि व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असतं. आयर्न हिमोग्लोबिन वाढवण्याचे कार्य करते. तर जीवनसत्व सी शरीरात आयर्न शोषण्याचं कार्य करतं. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे दोन्ही घटक आवश्यक आहेत. अशक्तपणा असलेल्या व्यक्तींनी पेरुचं सेवन करणे फायदेशीर ठरते.

मूळव्याधावर फायदेशीर

मूळव्याध असल्यास पेरुची साल खूप फायदेशीर असते. 10 ग्रॅम पेरुच्या सालीचं चूर्ण घेऊन त्याचा काढा तयार करुन प्यायल्यानं या समस्येपासून आराम मिळतो. मूळव्याध असलेल्या रुग्णांनी कमीतकमी 1 महिना हा काढा सतत प्यावा.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पेरुची पानं चघळल्याने शरीरातील ताप कमी होतो. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी पेरु खाण टाळावं. पेरु थंड असल्याने त्यात तंतुमय घटक अधिक असतात. ज्यामुळे गरोदर महिलेला अतिसार आणि बाळाला दूध देणाऱ्या महिलेला सर्दीचा त्रास उद्भवू शकतो.